• Download App
    ओवैसींच्या तोफा भाजपवर; पण मुंबईत रॅलीची परवानगी नाकारली महाविकास आघाडी सरकारने!! । Owaisi's gun on BJP; But Mahavikas Aghadi government denied permission for rally in Mumbai !!

    ओवैसींच्या तोफा भाजपवर; पण मुंबईत रॅलीची परवानगी नाकारली महाविकास आघाडी सरकारने!!

    वृत्तसंस्था

    मुंबई : एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी हे आक्रमक झाले असून सीएए आणि एनआरसी कायदे मागे घेण्यासाठी त्यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजप वरती ते रोज तोफा डागत आहेत. परंतु त्यांना मुंबईत रॅलीची परवानगी मात्र महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने नाकारली आहे. Owaisi’s gun on BJP; But Mahavikas Aghadi government denied permission for rally in Mumbai !!

    असदुद्दीन ओवैसी यांनी सत्तावीस 27 नोव्हेंबरला तारखेला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये रॅलीची परवानगी मागितली होती. परंतु मुंबई पोलिसांनी कोरोनाचे कारण देत रॅलीची परवानगी नाकारली आहे. मुंबईत कोरोनाची लाट पुन्हा येऊ शकते. ही शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे रॅलीला परवानगी देता येत नाही, असे प्रत्युत्तर मुंबई पोलिसांनी असदुद्दीन ओवैसी यांना कळविले आहे.



    यामागची राजकीय कारणे काय याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. असदुद्दीन ओवैसी भाजपवर तोफ डागताना आढळत असले तरी त्यांच्याकडे जर मुस्लिम मतांचा टक्का गेला तर त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या मतांच्या टक्केवारीला बसतो, ही यामागची खरी भीती आहे. महाराष्ट्रात असदुद्दीन ओवैसी यांचा प्रभाव वाढणे हे मतांची टक्केवारीच्या दृष्टीने भाजप आणि शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बसण्याची भीती आहे आणि त्यामुळे असदुद्दीन ओवैसी यांना मुंबईत रॅली देण्याची परवानगी नाकारलेले दिसते.

    Owaisi’s gun on BJP; But Mahavikas Aghadi government denied permission for rally in Mumbai !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!