• Download App
    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई , भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवा, शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मागणी|Our fight against those who tried to imprison Shiv Sena chief Balasaheb Thackeray,

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई , भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवा, शिवसेना आमदार सुहास कांदे यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात आमची लढाई सुरू असल्याचे सांगत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा  आरोप शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणो त्यांनी केली आहे.Our fight against those who tried to imprison Shiv Sena chief Balasaheb Thackeray, remove Bhujbal from the post of Guardian Minister, demand of Shiv Sena MLA Suhas Kande

    अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील वाद विकोपाला गेला आहे. भुजबळ यांच्याविरोधातील न्यायालयातील तक्रार मागे घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप केला आहे.



    नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातील जिल्हा नियोजन समितीच्या  निधी वाटपावरून हा वाद निर्माण झाला आहे.   शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात कोर्टात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या माणसांनी धमकावल्याची तक्रार आमदार कांदे यांनी नाशिक पोलिसांत केली आहे.

    निधी गैरव्यवहार प्रकरणी कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्या विरोधत सुहास कांदे यांनी घेतलेली भूमिका ही शिवसेनेची भूमिका मानली जात असून त्यामुळे महविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

    दरम्यान, कांदे यांनी पुन्हा पत्रकार परिषदेत आरोपांचा पुनरुच्चार केल्याने वाद आणखी वाढला आहे.सुहास कांदे हे शिवसैनिक आहे. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे  शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले.

    Our fight against those who tried to imprison Shiv Sena chief Balasaheb Thackeray, remove Bhujbal from the post of Guardian Minister, demand of Shiv Sena MLA Suhas Kande,

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!