विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोरोना संक्रमण लक्षात घेता राज्य सरकारने परवानगी दिलेल्या १० मानाच्या पालख्याच आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जातील असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिला. Only the PALAKHI of honor will go to Pandharpur, the decision of the High Court
इतर पालख्याना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. सरकारने विदर्भासोबत भेदभाव केला हा याचिकाकर्त्यांचा आरोप निराधार असल्याचे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
यंदाच्या वर्षीही आषाढी वारी प्रतिकात्मक होणार आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर प्रशासनाकडून येत्या 17 ते 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील दहा गावात संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची प्रतिकात्मक आषाढी वारी होत आहे.
वारीकाळात पंढरपूरला राज्यभरातील वारकरी येण्याची शक्यता असते. त्यामुळे पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील 10 गावात संचारबंदी करण्याची प्रशासनाची तयारी केली आहे. पंढरपूर शहराबरोबरच परिसरातील 10 गावात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Only the PALAKHI of honor will go to Pandharpur, the decision of the High Court
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानसाठी तस्करी करणाऱ्या दोन लष्करी जवानांना अटक, मादक पदार्थांच्या तस्करीची चौकशी करताना दोघे जाळ्यात
- लेबनान प्रचंड आर्थिक संकटात, जनतेचा उद्रेक होण्याची भीती
- गाझियाबादच्या दयावतींची दानशूरता, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास दान दिली १० कोटी रुपयांची जमीन दान
- Monsoon Session 2021 : पावसाळी अधिवेशनात काय कामकाज झाले? कोणती विधेयके – कोणते ठराव पास झाले? वाचा सविस्तर..