विशेष प्रतिनिधी
सांगली :- सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राडा केला. व्यापाऱ्यांनी कांद्याचा १ हजारांनी अचानक दर पाडल्याने शेतकऱ्यांनी राडा केला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा देत फळ मार्केटच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. यावेळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.Onion growers Farmers’ angry, cost of onion fell down by 1000 Rs
सांगलीच्या विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये जिल्हा बरोबर बाहेरून शेतकरी शेतीमाल घेऊन येत असतात. काल मार्केटमध्ये कांद्याला २७०० रुपये दर होता.काल पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी दर विचारून आपला कांदा आज मार्केट मध्ये आणला.
यावेळी अचानक एक हजार दर पाडण्यात आला. बाराशे ते पंधराशे रुपये दर देत असल्याने शेतकरी चांगलेच संतापले. आणि त्यांनी मार्केट मध्ये ठिय्या मांडला.. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा देत फळ मार्केटच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.. अडत दोन टक्के स्वीकारली जात असल्याने यावेळी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राडा
- सांगलीत विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये संताप
- कांद्याचा १ हजारांनी अचानक दर खाली
- शेतकरी संताप, घातला गोंधळ
- अडत दोन टक्के स्वीकारली
Onion growers Farmers’ angry, cost of onion fell down by 1000 Rs
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर प्रकरणावर प्रश्न विचारताच भडकले केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा, पत्रकाराशी केले असभ्य वर्तन
- मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच, तेही ओबीसी आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट
- स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्याजदरात वाढ, बेस रेटमध्ये ०.१० टक्के वाढ, बुधवारपासून लागू होणार नवे दर
- OBC Reservation; राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट का पूर्ण केली नाही?, केंद्राने नोटीस देऊनही राज्य सरकारने आयोग का नेमला नाही?, अचानक एम्पिरिकल डेटाची का मागणी करताहेत??