• Download App
    लोणावळ्यात हिंदू नववर्षांच्या निमित्त भव्य शोभायात्रा; हजारो हिंदू बांधवांचा सहभाग|On the occusion of Gudipadwa in lonavala big rally of Hindu new year

    लोणावळ्यात हिंदू नववर्षांच्या निमित्त भव्य शोभायात्रा; हजारो हिंदू बांधवांचा सहभाग

    गुढीपाडवा व हिंदू नववर्षांच्या निमित्त लोणावळा शहरात हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीणच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत हजारो हिंदू बांधव सहभागी झाल्याने अवघे लोणावळा शहर भगवेमय झाले होते.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – गुढीपाडवा व हिंदू नववर्षांच्या निमित्त लोणावळा शहरात हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीणच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत हजारो हिंदू बांधव सहभागी झाल्याने अवघे लोणावळा शहर भगवेमय झाले होते. जय श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी आज लोणावळा शहर व पंचक्रोश दुमदुमली होती.On the occusion of Gudipadwa in lonavala big rally of Hindu new year

    चार हजारांहून अधिक दुचाकी वाहने या शोभायात्रेत सहभागी झाली होती. सकाळी 10.30 वाजता पुरंदरे शाळा मैदानाहून निघालेल्या या शोभायात्रेचा समारोप 2.45 वाजता नांगरगाव येथे करण्यात आला. याठिकाणी मिलिंद एकबोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.



    प्रभू श्रीरामचंद्रांची सुमारे 12 फुट उंच प्रतिमा व आयोद्धा येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती या शोभायात्रेचे आकर्षण ठरली. शोभायात्रेत सर्वात पुढे प्रभू श्रीराम यांचा रथ त्या पाठोपाठ भारत मातेची प्रतिमा, छत्रपती शिवरायांचा सिंहासनाधीश पुतळा, त्यामागे दुचाकी वरील महिला व त्यानंतर दुचाकीवरील पुरुष अशी क्रमवारी लावण्यात आली होती.

    दोन वर्ष कोरोनामुळे शोभायात्रा होऊ शकली नव्हती. यावर्षी आजपासून कोरोनाचे सर्व निर्बंध हाटविल्याने हिंदू बांधव मोठ्या संख्येने आजच्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. जागोजागी शोभायात्रेवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मैदानावर,

    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व नांगरगाव याठिकाणी पिण्याचे पाणी, रसना वाटप करण्यात आला. नांगरगाव येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला भगिनींनी भगवान श्रीरामांच्या प्रतिमेवर जोरदार पुष्पवृष्टी केली. अतिशय शांततामय वातावरणात हिंदू धर्माच्या घोषणा देत शोभायात्रा पार पडली.

    On the occusion of Gudipadwa in lonavala big rally of Hindu new year

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस