Lonavala : लोणावळ्यात भीषण भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या धोक्यात आणखी भर पडली आहे.