• Download App
    महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यावर प्रथमच नितीन गडकरींचे भाष्य : शिंदेंना असे अमृत पाजले की, त्यांना अमरत्व प्राप्त!!nitin gadkari 2nd edition of the conference on Sankalp Se Siddhi Mumbai

    महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यावर प्रथमच नितीन गडकरींचे भाष्य : शिंदेंना असे अमृत पाजले की, त्यांना अमरत्व प्राप्त!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आम्ही एकनाथ शिंदेंना असे काही अमृत पाजले आहे की आता त्यांना अमरत्व प्राप्त झाले. आता त्यांची गाडी सुसाट जाईल. बुलेट ट्रेनच्याही पुढे जाईल, अशी खोचक टिप्पणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यावर प्रथमच गडकरींनी भाष्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सत्तांतर नाट्यात गडकरी दिल्लीत असूनही फार “दूरवर” होते, अशीही माहिती आहे. त्यामुळे गडकरींच्या या खोचक टिपण्णीला देखील विशेष महत्त्व आहे. nitin gadkari 2nd edition of the conference on Sankalp Se Siddhi Mumbai

    “संकल्प से सिद्धी” परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये झाली. या कार्यक्रमात ते बोलत होते.

    नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

    समृध्दी महामार्ग महत्वाचा

    पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्सप्रेस वे असेल किंवा या महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल असोत यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण होणार आहे. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे.

    रस्ते बांधणे हे माझे स्वप्न

    गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वरळी सी लिंकला नरीमन पॉईट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीपटीपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरु केले आहे.

    nitin gadkari 2nd edition of the conference on Sankalp Se Siddhi Mumbai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!