• Download App
    बलात्कारी बाबा नित्यानंदने त्याच्या 'मालकी'च्या 'कैलाश देशा'त पर्यटकांना येण्यास घातली मनाई! | Nithyanand banned entry in his country Kailash amid cororna spread threat

    WATCH : बलात्कारी बाबा नित्यानंदला कोरोनाची भीती, म्हणाला माझ्या ‘कैलाश देशा’त येऊ नका

    Baba Nithyanand – श्रद्धा ही आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपली कशावर तरी श्रद्धा असणं हे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतं. पण ही श्रद्धा जेव्हा अंधश्रद्धा बनते तेव्हा काही भोंदूबाबा त्याचा गैरफायदा घेतात. अशा काही ढोंगींमुळं मग सर्वच साधु संतांकडे लोक संशयानं पाहू लागतात. असाच एका ढोंगी किंवा त्याला बलात्कारी म्हणता येईल असा बाबा म्हणजे नित्यानंद. बलात्काराच्या आरोपानंतर नित्यानंद भारतातून फरार झाला आणि इक्वाडोरजवळ त्यानं एक बेट विकत घेत त्यावर अक्षरशः स्वतःचा देश निर्माण केल्याचा त्याचा दावा आहे. त्याला त्यानं कैलाश असं नाव दिलं असून ते जगातलं एकमेव हिंदूराष्ट्र असल्याचा त्याचा दावा आहे. स्वतःला जणू देवच समजणाऱ्या या नित्यानंदला आता मात्र कोरोनाची भीती वाटायला लागलीय. कारण त्यानं त्याच्या देशात कोणीही येऊ नये असं फर्मान काढलंय. Nithyanand banned entry in his country Kailash amid cororna spread threat

    हेही पाहा – 

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!