NIRF Ranking 2021 : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 वर्षासाठी राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (NIRF) रँकिंग जाहीर केली आहे. व्हर्च्युअल माध्यमातून हा कार्यक्रम झाला. शिक्षण मंत्रालयाने देशातील विविध सर्वोत्तम महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून घोषित करण्यात आले आहे. 8 आयआयटी आणि 2 एनआयटीचा समावेश टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, खेदाची बाब म्हणजे यात महाराष्ट्रातील एकाही संस्थेचा समावेश नाही. NIRF Ranking 2021 Not A Single Institute From Maharashtra In Top 10 Know Selection criteria
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2021 वर्षासाठी राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन (NIRF) रँकिंग जाहीर केली आहे. व्हर्च्युअल माध्यमातून हा कार्यक्रम झाला. शिक्षण मंत्रालयाने देशातील विविध सर्वोत्तम महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून घोषित करण्यात आले आहे. 8 आयआयटी आणि 2 एनआयटीचा समावेश टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, खेदाची बाब म्हणजे यात महाराष्ट्रातील एकाही संस्थेचा समावेश नाही.
यंदा महाराष्ट्रातील एकही संस्था यादीत नाही
एनआयआरएफ रँकिंग टिचिंग, लर्निंग, रिसर्च, व्यावसायिक पद्धती, आउटरीच आणि सर्वसमावेशकतेच्या आधारे विद्यापीठ आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये रॅंकिंग जाहीर केली जाते. 2019 मध्ये एकूण 8 श्रेणींमध्ये पहिल्या 10 सर्वोत्कृष्ट संस्थांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात महाराष्ट्रातील 3 संस्थाचा 5 श्रेणींमध्ये समावेश होता.
या आहेत देशातील टॉप 10 संस्था
NIRF Rank 1- IIT मद्रास
NIRF Rank 2- IISC, बंगळऊरू
NIRF Rank 3- IIT, बॉम्बे
NIRF Rank 4- IIT, दिल्ली
NIRF Rank 5- IIT, कानपूर
NIRF Rank 6- IIT, खडगपूर
NIRF Rank 7- IIT, रुरकी
NIRF Rank 8- IIT, गुवाहाटी
NIRF Rank 8- JNU, दिल्ली
NIRF Rank 9- IIT,रुरकी
NIRF Rank 10- BHU, वाराणसी
एनआयआरएफ रँकिंग २०२१ टॉप १० कॅटेगरी
एनआयआरएफ रँकिंग २०२१ एकूण १० कॅटेगरीमध्ये जाहीर करण्यात आली. या टॉप कॅटेगरीमध्ये विद्यापीठ, व्यवस्थापन, महाविद्यालय, फार्मसी, वैद्यकीय, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, आणि एआरआयआयए (इनोव्हेशन अचीव्हमेंट्सवरील संस्थांची अव्वल रँकिंग) यांचा समावेश आहे. नॅशनल इंस्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्वीकारून २९ सप्टेंबर २०१५ रोजी लाँच केले.
काय होते निकष?
एकूण विद्यापीठे, इंजिनिअरिंग संस्था, महाविद्यालये, मॅनेजमेंट संस्था, फार्मसी, मेडिकल, आर्किटेक्चर, लॉ अशा विविध अभ्यासक्रमांच्या संस्थांच्या बाबतीत हे रँकिंग केले जाते. संस्थांमधील शिकवणी, सोयी-सुविधा, संशोधन, पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आदी विविध विविध निकषांवर ही क्रमवारी दिली जाते. महाराष्ट्रातील संस्था याबाबतीत कमी पडल्या असेच यावरून म्हणावे लागेल.
करोना प्रादुर्भाव काळात शैक्षणिक संस्था बंद राहिल्याने या संदर्भातील माहिती मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे यावर्षी NIRF रँकिंग जाहीर करण्यास देखील उशीर झाला आहे. गेल्यावर्षी एनआयआरएफ रँकिंग १० जूनलाच जाहीर करण्यात आली होती.
NIRF Ranking 2021 Not A Single Institute From Maharashtra In Top 10 Know Selection criteria
महत्त्वाच्या बातम्या
- Javed Akhtar Defamation Case : कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, अब्रूनुकसानीचा खटला रद्द करण्याची याचिका फेटाळली
- NIRF Rankings 2021 : मिरांडा हाउस बेस्ट कॉलेज, इंजिनिअरिंगमध्ये IIT मद्रास टॉप, शिक्षण मंत्रालयने जारी केली NIRF रँकिंग
- WATCH : पाक सीमेलगतच्या महामार्गावर 2 केंद्रीय मंत्र्यांसह सुपर हर्क्युलसचे थरारक लँडिंग, जॅग्वार आणि सुखोई विमानेही उतरली
- कोरोनाविरोधी लसीचे आणखी एक पाऊल; भारत बायोटेकच्या नाकाद्वारे लसीची चाचणी
- २८ एकरचे ऐतिहासिक शिवाजी पार्क आता दिव्यांच्या रोषणाईत न्हावून निघणार