वृत्तसंस्था
पुणे : राज्यात कोरोना, म्युकरमायकोसिस संसर्ग सुरु असताना साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. Nipah virus Is found In the Bats of Mahabaleshwar caves
राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा घातक विषाणू आढळला आहे. जर हा विषाणू माणसांमध्ये आला तर तो अत्यंत धोकादायक समजला जातो. कारण त्यावर उपाय नाही आणि हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो, असे रिसर्च पेपरमध्ये सांगितले आहे. दोन वर्षांपूर्वी केरळमध्ये निपाह हा विषाणू आढळला होता. फैलाव झाल्यामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला.
‘निपाह’ विषाणू म्हणजे काय?
- जनावरे आणि माणसावर वेगाने हल्ला करतो आणि गंभीर आजार निर्माण होतात
- पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, १९९८ मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगईमधील निपाह नावाच्या गावात विषाणू सापडला
- सुरुवातीला डुकरांना लागण झाली, नंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पसरला
- बांगलादेश आणि मलेशियात प्रमाण जास्त
- ‘निपाह’ची लक्षणं कोणती ?-
- संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्क आल्यामुळे थेट मेंदूवर हल्ला करतो
- मेंदुत ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण
- सुरुवातीला ७-१० दिवस ताप, थकवा, शुद्ध हरपणं, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळणं, अस्वस्थ वाटणं
- तत्काळ उपचार न घेतल्यास पुढील २४-४८ तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता
Nipah virus Is found In the Bats of Mahabaleshwar caves
महत्त्वाच्या बातम्या
- म्यानमारमधील संघर्षांचा लाखो नागरिकांना फटका, लाखो जण देश सोडण्याच्या तयारीत
- राज्यात म्युकरमायकोसिस रूग्णसंख्या पोचली सात हजारांवर; ७२९ रूग्ण आजपर्यंत दगावले
- पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा
- करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने ब्रिटनची उडाली झोप
- मुलीचे शाळेत अॅडमिशन नाही, बापाने ई-मेलद्वारे दिली चक्क मंत्रालय बॉम्बने उडविण्याची धमकी