• Download App
    संसदेत कोकणाची अब्रु घालविणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले यावर बोलू नये, निलेश राणे यांचा हल्लाबोल|Nilesh Rane's attack on Vinayak Raut, those who have tarnished Konkan's reputation in Parliament

    संसदेत कोकणाची अब्रु घालविणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले यावर बोलू नये, निलेश राणे यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संसदेत कोकणाची अब्रू घालवणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले होते त्यावर बोलू नये असं निलेश राणेंनी विनायक राऊत यांना सुनावले आहे. लोकसभेत एका प्रश्नला उत्तर देताना नारायण राणे अडखळल्याचा व्हीडिओ शिवसेनेने व्हायरल केला आहे.Nilesh Rane’s attack on Vinayak Raut, those who have tarnished Konkan’s reputation in Parliament

    तसंच खासदार विनायक राऊत यांनी या भाषणाची खिल्ली उडवली आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे आक्रमक झाले आहेत.अर्ध मराठी, अर्ध हिंदीतू बोलून महाराष्ट्राची आणि कोकणाची अब्रू तुम्ही दिल्लीत घालवली.



    तुम्हाला कधी बाळासाहेब ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं आहे? तुम्ही नारायण राणेंवर बोलत आहात. पण लक्षात ठेवा ते मुख्यमंत्री होते, आता केंद्रात मंत्री आहेत. जे संसदेत धड बोलू शकत नाहीत ते नारायण राणेंवर कसे काय बोलतात? असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

    लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता. डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले.

    यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. स्वाभिमान पक्षाचे काही लोक हे विकृतीने पछाडलेले आहेत. त्यामुळे त्यांना हिंदी काय, इंग्रजी काही भाषेचा संबंध नसतो.

    मराठीही नाही. त्यामुळे कुठे ना कुठे घाण करायची अशा पद्धतीने त्यांचं काम आहे. लोकसभेत मला सुद्धा प्रश्न विचारता आला असता. पण ते आपलेच गाववाले आहेत,आपण दुर्लक्ष करायाला पाहिजे असं म्हणत उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला आहे.

    Nilesh Rane’s attack on Vinayak Raut, those who have tarnished Konkan’s reputation in Parliament

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !