विशेष प्रतिनिधी
सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या कोयना अभयारण्यातील बफर झोनमध्ये वन विभागाच्या वतीने रात्रीची जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय पर्यटनवाढीसाठी घेण्यात आल्याची माहिती उप वन संरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे. Night jungle safari at Koyna Sanctuary; Satara Forest Department’s decision to increase tourism
२१ मार्च या जागतिक वन दिनाचे औचित्य साधून रात्रीची जंगल सफारी सुरू करण्याचा वन विभागाचा मानस आहे. कोयना अभयारण्यातील बफर झोन कास,बामणोली,महाबळेश्वर,चाळकेवाडी,ठोसेघर,प्रतापगड, या जंगल परिसरात ही जंगल सफारी होणार आहे. सातारा वन विभागा सुरू करत असलेल्या रात्रीच्या जंगल सफारीची सातारकरांना उत्सुकता लागली असून या अनोख्या उपक्रमाचे पर्यटकांनी देखील स्वागत केले आहे.