• Download App
    Aryan Khan Drug Case : आर्यन खानचे समुपदेशन खरे की बनावट? राष्ट्रवादीचा एनसीबीला सवाल, व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्याचे आव्हान । NCP Nawab Malik challenges NCB to release video of Aryan Khans counseling in mumbai arthur road jail

    Aryan Khan Drug Case : आर्यन खानचे समुपदेशन खरे की बनावट? राष्ट्रवादीचा एनसीबीला सवाल, व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवण्याचे आव्हान

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये आहे. एनसीबीने आर्यन खानचे समुपदेशन केल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले. आर्यन खानने समुपदेशनात एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, तुरुंगातून बाहेर गेल्यावर तो ड्रग्जला स्पर्शही करणार नाही आणि देशाचा एक जबाबदार नागरिक बनेल. पण आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या समुपदेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. NCP Nawab Malik challenges NCB to release video of Aryan Khans counseling in mumbai arthur road jail


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्थर रोड जेलमध्ये आहे. एनसीबीने आर्यन खानचे समुपदेशन केल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले. आर्यन खानने समुपदेशनात एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, तुरुंगातून बाहेर गेल्यावर तो ड्रग्जला स्पर्शही करणार नाही आणि देशाचा एक जबाबदार नागरिक बनेल. पण आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या समुपदेशनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    नवाब मलिक म्हणाले की, NCBने जर आर्यन खानचे समुपदेशन केले असेल तर त्या समुपदेशनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बाहेर आणा. नवाब मलिक यांचे म्हणणे आहे की, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानचे तुरुंगात समुपदेशन केले होते, अशा सकारात्मक बातम्या आणून प्रसिद्धी स्टंट केला जात आहे.



    समीर वानखेडेला काय म्हणाले?

    मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना समुपदेशनादरम्यान सांगितले होते की, तो तुरुंगातून बाहेर जाऊन गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना मदत करेल. तो असे काम करेल की प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटेल. आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले होते की, भविष्यात त्याचे नाव चुकीच्या कारणांसाठी कधीही येणार नाही. मुनमुन धमिचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंटसह आर्यन खान यांना एनसीबीने मुंबई क्रूज ड्रग्स पार्टीमध्ये अटक केली होती.

    20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये

    आर्यन खानला जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलून स्थानिक न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे तो 20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये आहे. यानंतर त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, शाहरुख खानने आर्यन खानला 4500 रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. या पैशातून आर्यन खान जेलच्या कॅन्टीनसाठी खर्च करू शकतो. जेल मॅन्युअलनुसार आरोपींना त्यांच्या खर्चासाठी दरमहा मनीऑर्डर पाठवता येतात. परंतु मनी ऑर्डरसाठी ही रक्कम 4500 पेक्षा जास्त असू शकत नाही.

    NCP Nawab Malik challenges NCB to release video of Aryan Khans counseling in mumbai arthur road jail

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!