प्रतिनिधी
मुंबई : हैदराबाद चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सूचक ट्विट केले आहे.NCP – MIM Alliance: Imtiaz Jalil’s offer, Supriya Sule happy !!; Nationalist – Favorable for MIM Front !!
समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही आनंदाची गोष्ट आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळेंचे हे विधान राष्ट्रवादी-एमआयएमच्या युतीसाठी सकारात्मक असल्याने आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र येऊन काम करायचे असल्यास सगळ्याच समविचारी पक्षांनी एकत्र येणं ही आनंदाची गोष्ट आहे. विकास कामांसाठी सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचं भलं होणार असेल तर कुठल्याही राज्यासाठी ही चांगलीच गोष्ट असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
तसेच याबाबत शिवसेनेची भूमिका काय याबाबत फारशी माहिती नाही. सगळा विषय समजून घेतल्यावरच याबाबत भाष्य करणे योग्य ठरेल, अशी सावध भूमिकाही त्यांनी प्रतिक्रिया देताना घेतली आहे.
इम्तियाज जलील यांची ऑफर
एमआयमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांच्यात आघाडीची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. एमआयएमचे खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
NCP – MIM Alliance: Imtiaz Jalil’s offer, Supriya Sule happy !!; Nationalist – Favorable for MIM Front !!
महत्त्वाच्या बातम्या
- साहित्याच्या वाढत्या दरामुळे क्रेडाई महाराष्ट्र काम बंद ठेवण्याच्या विचारात
- पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापूरमध्ये होणार
- NCP MIM Alliance : राष्ट्रवादीने जरूर एमआयएम सोबत जावे; ते सगळे “एकच”; देवेंद्र फडणवीसांचा टोला
- मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून रोखले खडकवासला जलाशयाचे प्रदूषण