विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यादरम्यान खरा राजकीय स्फोट झाला आहे. महाविकास आघाडी फुटली असून तशी औपचारिक घोषणा बाकी असल्याचे अंतर्गत गोटातून सांगण्यात येत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे आयोजनाची जबाबदारी असलेल्या सगळ्या वज्रमूठ सभा पक्षाने रद्द केल्याच्या बातम्या पुढे आल्या आहेत. तसंही शरद पवार वज्रमूठ सभेस उपस्थित राहातही नव्हते. राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर तसेच संभाजीनगरच्या वज्रमूठ सभांना पवार उपस्थित राहिले नव्हते. प्रत्येक पक्षाचे दोन नेते उपस्थित राहतील, असेच ठरले आहे, असे त्यांनी सांगितले होते. पवारांच्या या अनुपस्थितीचे “रहस्य” आता उघड होत आहे!!NCP cancelled MVA vajramooth sabha of kolhapur, pune and nashik, big cracks in MVA??
छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबई या तीन वज्रमूठ सभा पार पडल्या आहेत. यापैकी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या वज्रमूठ सभांच्या आयोजनाची जबाबदारी शिवसेनेच्या ठाकरे गटाने स्वीकारून ती पार पाडली आहे. नागपूरच्या वज्रमूठ सभेची जबाबदारी काँग्रेसवर होती. ती त्या पक्षाने पार पाडली आहे. त्यानंतर आता कोल्हापूर, पुणे आणि नाशिक या तीन वज्रमूठ सभांच्या आयोजनाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने या सभाच रद्द केल्याची घोषणा केल्याची बातमी झी 24 तासने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
अर्थातच त्यामुळे शरद पवारांच्या निवृत्ती नाट्यामुळे महाविकास आघाडीलाच सुरूंग लागला आहे. शरद पवार प्रणित ठाकरे – पवार सरकार जाऊन 9 महिने झाल्यानंतर तसाही महाविकास आघाडीचा राजकीय रेलेव्हन्स संपला होता. काँग्रेसने आधीच वेगळा सूर लावला आहे. ठाकरे आणि पवार यांना एकमेकांशी धरून राहण्याची पर्याय नाही म्हणून महाविकास आघाडी टिकली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच आहे. पण आता शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांनी जबाबदारी घेऊन यशस्वी केलेल्या वज्रमूठ सभा झाल्यानंतर राष्ट्रवादीची जबाबदारी असलेल्या वज्रमूठ सभा पक्षाने रद्द करून महाविकास आघाडीच्या एकजुटीत पाचर मारली आहे.
NCP cancelled MVA vajramooth sabha of kolhapur, pune and nashik, big cracks in MVA??
महत्वाच्या बातम्या
- Karnataka Election : ‘’आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता…’’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा!
- खुंटा हलवून केला बळकट, डोळ्यातून काढले पाणी; कोणीही केला अध्यक्ष, तरी आमदारांची गाठणार का शंभरी??
- खुंटा केला हलवून बळकट डोळ्यातून काढले पाणी; पण खरी तर बातमी लपली अजितदादांच्या दरडावणीत!!
- शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर नेते, कार्यकर्ते रडत असताना, अजित पवारांच्या भूमिकेवरून चर्चांना उधाण!