• Download App
    फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले; दाऊदचा माणूस रियाझ भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा..., नवाब मलिकांची आरोपांची फटाक्यांची माळ । nawab malik targets devendra fadanavis

    फडणवीसांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले; दाऊदचा माणूस रियाझ भाटी पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा…, नवाब मलिकांची आरोपांची फटाक्यांची माळ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले होते. हा रियाझ भाटी कोण आहे? हा बनावट पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला होता. दाऊद आणि इतर टोळ्यांशी ह्याचे संबंध असल्याचे सर्वांना माहिती होते. दोन पासपोर्टसह हा पकडला जाऊनही दोन दिवसांत सुटला. हा भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि फडणवीसांच्या डिनर टेबलवर दिसायचा. तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमातही पोहोचला होता, असा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.  नवाब मलिक आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते. त्यांनी आरोपांच्या फटाक्यांची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लावली. nawab malik targets devendra fadanavis



    नवाब मलिक म्हणाले…

    पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कोणी जात असल्यास संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणाला प्रवेश दिला जात नाही. पंतप्रधान मोदी मुंबईत आले असताना त्या कार्यक्रमातही रियाज भाटी होता. तो तिथे कसा पोहोचला? -काळ्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर बरेच काही बोलता येऊ शकते. वरळीमध्ये २०० कोटींचे फ्लॅट कोणाच्या नावाने आहेत? बीकेसीत कोणाचे फ्लॅट आहेत आणि तिथं कोण राहतेय? असे अनेक प्रश्न आहेत. ह्या सगळ्या प्रकारांची माहिती मी राज्याच्या गृहविभाला देणार आहे.

    nawab malik targets devendra fadanavis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप; नागपूरमधून योजनेला सुरुवात

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- राज्यात कुठेही हिंदी लादली जात नाही; भारतीय भाषेला विरोध करून इंग्रजीचे गोडवे गाण्याचे वाईट वाटते