महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करावे अशी देखील मागणी करण्यात आली. Nawab Malik should resign immediately; BJP workers protest at Powai Naka in Satara
विशेष प्रतिनिधी
सातारा : भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथे नवाब मलिक यांच्या फोटोला काळे फासून निषेध करण्यात आला.१९९३ मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील शिक्षा भोगत असलेले आरोपी व अतिरेक्यांशी जाहीर संबंध असलेल्या महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त करावे, तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी पोवई नाका येथे हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे ,ऍड प्रशांत खामकर, चंदन घोडके, प्रशांत जोशी, नितीन कदम, रीना भणगे, सुनिशा शहा, कुंजा खंदारे, अश्विनी हुबळीकर, वनिता पवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Nawab Malik should resign immediately; BJP workers protest at Powai Naka in Satara
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!