विशेष प्रतिनिधी
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक असलेले समीर वानखेडे यांची मुदत संपल्यानंतर आहे त्यांच्या नियुक्तीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्या प्रदेश नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवून त्यांनी भाजपचे नेते समीर वानखेडे यांच्या प्रतिनियुक्तीसाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप केला आहे. Nawab Malik attacks BJP leaders; Ajit Pawar’s hand of cooperation in front of Narayan Rane !! NCP’s double standard ??
एकीकडे अशाप्रकारे नवाब मलिक हे भाजप नेत्यांवर तोफा ङागत असताना दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यामुळे सहकार्याचा हात केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेत त्यांचे मी अभिनंदन करतो. नारायण राणे यांनी केंद्रातून निधी आणावा आणि राज्य सरकार मार्फत आम्ही कोकणासाठी निधी पुरवतो दोघे मिळून कोकणाचा कायापालट करू, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी नारायण राणे यांच्या पुढील सहकार्याचा हात केला आहे. पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर अजित पवार हे बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
नारायण राणे यांनी अजित पवारांवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले होते. राज्याचे अर्थमंत्री सिंधुदुर्गात येतात आणि महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांचा पराभव करून जातात, असे नारायण राणे म्हणाले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत लोकांनी ज्यांना सत्ता दिली त्यांनी चांगले काम करावे असा सल्ला दिला. त्याच वेळी नारायण राणे यांनी केंद्रातून निधी आणावा आम्ही राज्यातून कोकणाला निधी पुरवतो. दोघे मिळून कोकणचा पाया करतात कायापालट करू, असे आवाहन केले.
एकीकडे नवाब मलिक यांच्या तोफा रोज भाजप नेत्यांवर सुटत आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचा नारायण राणे यांच्या पुढे सहकार्याचा हात करत आहेत. ही राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी चाल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांची पंगा घेऊन झाला. पण अखेरीस आघाडीलाच माघार घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील घटक पक्ष शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी देखील दुटप्पी राजकारण खेळते आहे का? या खेळातूनच अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यापुढे सहकार्याचा हात केला आहे का? याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Nawab Malik attacks BJP leaders; Ajit Pawar’s hand of cooperation in front of Narayan Rane !! NCP’s double standard ??
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा ; आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मागणी
- तुम्ही शांत रहा, हे राज्य तुमचे नाही, माझं आहे ; डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ज्येष्ठ नागरिकांना खडसावले
- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हस्ते जालन्यातून पहिल्या किसान रेल्वेला हिरवी झेंडी, 350 टन कांदा आसामकडे रवाना