प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने स्वच्छ शहर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर केला असून नवी मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेने अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक पटकवलेला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांना सहा गटात विभागले गेले होते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी आणि ५ कोटी मिळाले आहेत.Navi Mumbai once again won the clean city competition
गटवारीनुसार विजेते
गट अ आणि ब मध्ये नागपूर, ठाणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला. तर गट क मध्ये नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिकांचा अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर आला आहे. तसेच ड गटामध्ये पनवेलला पहिला, अमरावतीला दुसरा आणि अहमदनगर महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. शुक्रवारी नागरी सेवा दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित समारंभात मुख्यमंत्र्यांकडून विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.
तर नगरपरिषदेच्या अ आणि ब गटात शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, हिंगोली नगरपरिषद आणि बुलढाणा नगरपरिषदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर सोनपाथ, नळदुर्ग आणि पांढरकवडा नगरपरिषदेला अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेत्या महानगरपालिकेनी, नगरपरिषदेनी बाकीच्या गावांना, शहरांना मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर निर्णय फक्त कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे यानिमित्त म्हणाले.
Navi Mumbai once again won the clean city competition
महत्वाच्या बातम्या
- अतिक अहमदच्या कबरीवर तिरंगा ठेवणाऱ्या काँग्रेस नेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- ट्विटरने कोणालाही सोडले नाही! राहुल गांधी, योगींपासून ते शाहरुख-सलमानपर्यंत सर्वांच्या हटवल्या लेगसी ब्ल्यू टिक्स
- भारताच्या लोकसंख्येवर चीनने म्हटले- संख्या नव्हे, गुणवत्ता महत्त्वाची, चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- आमचे 90 कोटी लोक कामाचे, त्यांच्यात टॅलेंटही आहे
- कॉंग्रेसने इतिहास पळवला, स्वत:ला हवा तसा लिहून घेतला; सावरकर स्मारकातून मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल