• Download App
    राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये कल्चर्ड नेते, दरोडेखोर नाहीत; चंद्रकांतदादांचे टोले । Nationalist untrustworthy, cultured leaders in Congress, not robbers; Tole of Chandrakantdada

    राष्ट्रवादी बिनभरवशाची, काँग्रेसमध्ये कल्चर्ड नेते, दरोडेखोर नाहीत; चंद्रकांतदादांचे टोले

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस सांगलीत भाजपच्या जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसकडे कल्चर्ड नेते आहेत. दरोडेखोर नाहीत पण राष्ट्रवादी बिनभरवशी पक्ष असल्याचा टोला चंद्रकांतदादांनी लगावला. Nationalist untrustworthy, cultured leaders in Congress, not robbers; Tole of Chandrakantdada

    एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने घेतलेली भूमिका मान्य नाही, असं म्हणत सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं. या आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी भाजपसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले.



    राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सांगलीमध्ये भाजपमध्ये सलगी करत आहेत, या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही. सकाळी एक राजकारण, दुपारी एक राजकारण आणि संध्याकाळी एक राजकारण. एकवेळ काँग्रेस परडवली. काँग्रेसमधील सर्व व्यक्तीमत्व वेल कल्चर्ड असतात. दरोडेखोर नसतात. राष्ट्रवादीने सलगी करणे याला भाजप कधीच भूलणार नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत करत असलेल्या डावाला भाजप फसणार नाही. राष्ट्रवादी जवळ येऊ पाहतेय, पण आम्ही त्यांना जवळ येऊ देणार नाही.

    प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. गुरुवारी बैठकीत तोडगा निघाला असे सांगितले होते. मात्र, अनेक ठिकाणी आजही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कृती समिती शासनासोबत डील करतेय, असा आरोप करत आंदोलन पुकारण्यात आले आहे.

    Nationalist untrustworthy, cultured leaders in Congress, not robbers; Tole of Chandrakantdada

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस