वृत्तसंस्था
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचे ठाकरे – पवार सरकारचे प्रयत्न आहेत. याच प्रयत्नांमधून नारायण राणे यांना नाशिक पोलीसांनी २ सप्टेंबरला नाशिक पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. Nashik Police send notice to Union Minister Narayan Rane in connection with an FIR against him and asked him to appear at the police station on 2nd September: Nashik Police
महाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर नारायण राणे यांना नाशिक पोलीस आणि पुणे पोलीस ताब्यात घेणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. तरीही नारायण राणे यांना अशाच नोटीसा महाराष्ट्रातील अन्य शहरांमधील पोलीस ठाण्यांमधून काढण्यात येतील आणि त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांनी काल सकाळी एकत्र जमून भाजपच्या बंद असलेल्या कार्यालयावर जोरदार दगडफेक करून शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. यावेळी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांचा उल्लेख कुटुंबप्रमुख म्हणून करीत होते. नारायण राणे यांच्या बैलाला… वगैरे घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाच्या काचा फुटल्या. पण या वेळी ते कार्यालय बंद होते. तेथे कोणीही हजर नव्हते. मात्र, याबाबत नाशिक पोलीसांनी अद्याप कोणता गुन्हा दाखल केलेला नाही.
Nashik Police send notice to Union Minister Narayan Rane in connection with an FIR against him and asked him to appear at the police station on 2nd September: Nashik Police
महत्त्वाच्या बातम्या
- दूषीत हवेचे शुद्धीकरण करणारा देशातील पहिला ‘स्मॉग टॉवर’ दिल्लीत कार्यरत
- काश्मीर खोऱ्यात वर्षभरात १०२ दहशतवाद्यांचा खात्मा, लष्करेचे तीन दहशतवादी ठार
- खंडणीच्या रक्कमेचे मनी लाँड्रिंग, अनिल देशमुखांचे सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
- उज्जैनच्या व्यक्तींची घोषणा पाक झिंदाबाद नाही, दिग्विजय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात