Friday, 9 May 2025
  • Download App
    माझ्या फंद्यात पडून नका नाहीतर पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन, नारायण राणेंचे अजितदादांना प्रत्युत्तर Narayan Rane's reply to Ajitdada pawar

    माझ्या फंद्यात पडून नका नाहीतर पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन, नारायण राणेंचे अजितदादांना प्रत्युत्तर

    प्रतिनिधी

    मुंबई : चिंचवड पोटनिवडणूकीत एका प्रचारसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर एक बोचरी टीका केली होती. ज्यामुळे आता पवार आणि राणेंमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका बाईनं निवडणुकीत पाडलं अशी बोचरी टीका अजितदादांनी नारायण राणेंवर केली होती. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पुण्यात येऊन तुमचे बारा वाजले अशा शब्दात अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. Narayan Rane’s reply to Ajitdada pawar

    नारायण राणे काय म्हणाले?

    प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, अजित पवारांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं हे मला माहिती नाही. खरंतर मला त्यांच्याबद्दल बोलायची इच्छा नाही. अजित पवार ज्या प्रकारचे राजकारणी आहेत, त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्याचं बारसं करायला जाऊ पण नये, नाव ठेवायचं. त्यामुळे माझ्या फंद्यात पडून नका, नाहीतर मी पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन!!



    पुढे राणे म्हणाले की, ‘माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबई आहे. पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवलं. तिकडून सलग सहावेळा निवडणूक आलो, एक नाही तर सहा वेळेला. त्यानंतर काँग्रेसच्या सोनिया गांधींनी सांगितलं, तुम्ही वांद्र्यातून उभे राहा. त्यांच्या म्हणण्यानुसार उभा राहिलो, माझ्या मतदारसंघात उभा नाही राहिलो. आणि महिला किंवा पुरुषांनं पाडणं असो उमेदवार हा उमेदवार असतो. तर महिला आणि पुरुषांमध्ये काय फरक करता. आता ती महिला आहे का त्यांच्याकडे, आता कोणाकडे आहे?’

    – नारायण राणेंना कोणी पाडलं होत?

    २०१५ मधील वांद्रे पूर्वच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंना हरवले होते. यावेळेस नारायण राणे काँग्रेसकडून रिंगणात उतरले होते. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. तृप्ती सावंत यांनी तब्बल २० हजारांच्या फरकाने नारायण राणेंचा पराभव केला होता. पण २०२१ मध्ये तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    Narayan Rane’s reply to Ajitdada pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    Icon News Hub