• Download App
    दिशा सालियनच्या मारेकरी मंत्र्याला आत मध्ये घालू; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची नाव न घेता उघड धमकी Narayan Rane threatened to arrest maharashtra minister involved in murder of Disha Salian

    दिशा सालियनच्या मारेकरी मंत्र्याला आत मध्ये घालू; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची नाव न घेता उघड धमकी

    विशेष प्रतिनिधी

    खालापूर : आपल्या जन आशीर्वाद यात्रेवर 42 गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे – पवार सरकारचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. माझ्या जन आशीर्वाद यात्रेवर कोविड प्रोटॉकल तोडल्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे – पवार सरकारमधल्या मंत्र्यावर दिशा सालियन हिच्या खुनाचा आरोप आहे. त्याला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. Narayan Rane threatened to arrest maharashtra minister involved in murder of Disha Salian

    नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रायगड जिल्ह्यात पोहोचली. मुंबईतून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये सहभागी नेत्यांवर नि कार्यकर्त्यांवर कोविड प्रोटोकॉल सोडल्याचे 42 गुन्हे ठाकरे – पवार सरकारच्या पोलिसांनी दाखल केले आहेत. त्यावर छेडले असता राणे चांगलेच भडकले. दिशा सालियन या सुशांतसिंह राजपूत यांच्याशी संबंधित होत्या. सुशांत यांच्या संशयास्पद मृत्यूपूर्वीच दिशा यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील एका युवा मंत्र्याचे नाव गोवले जात आहे. राणे यांनीही या मंत्र्याचे नाव उघडपणे घेण्याचे टाळले.



    यावर खरपूस टीका करताना नारायण राणे म्हणाले, माझ्यावर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, पण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधील मंत्र्यावर अभिनेता सुशांत सिंग रजपुत यांची मैत्रीण दिशा सालियन हिच्या खुनाचा गुन्हा आहे. त्याला ठाकरे – पवार सरकार झाकून ठेवते आहे. आम्ही त्याला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला त्या गुन्ह्याबद्दल आतमध्ये टाकल्याशिवाय देखील राहणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

    Narayan Rane threatened to arrest maharashtra minister involved in murder of Disha Salian

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य