प्रतिनिधी
खालापूर : आपल्या जन आशीर्वाद यात्रेवर 42 गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे – पवार सरकारचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. “माझ्या जन आशीर्वाद यात्रेवर कोविड प्रोटॉकल तोडल्याचे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे – पवार सरकारमधल्या मंत्र्यावर दिशा सालियन हिच्या खुनाचा आरोप आहे, त्याला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.Narayan Rane targets Aditya Thackeray over Disha Saliyan murder case
नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज रायगड जिल्ह्यातल्या खालापूर येथे पोहोचली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील उल्लेख केला. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा तीन दिवसांपासून सुरू आहे. मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा रायगड जिल्ह्यात पोहोचली. गेल्या तीन दिवसांमध्ये या आशीर्वाद यात्रेतील सहभागी नेत्यांवर नि कार्यकर्त्यांवर covid-19 प्रोटोकॉल सोडल्याचे 42 गुन्हे ठाकरे – पवार सरकारच्या पोलिसांनी दाखल केले आहेत.
यावर खरपूस टीका करताना नारायण राणे म्हणाले, माझ्यावर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, पण महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधील मंत्र्यावर अभिनेता सुशांत सिंग रजपुत याची मैत्रीण दिशा सालियन हिच्या खुनाचा गुन्हा आहे. त्याला ठाकरे – पवार सरकार झाकून ठेवते आहे.
आम्ही त्याला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याला त्या गुन्ह्याबद्दल आतमध्ये टाकल्याशिवाय देखील राहणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.दिशा सालियन हिच्या कधीच आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव आहे. त्यांना उद्देशून नारायण राणे यांनी शेलक्या शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
Narayan Rane targets Aditya Thackeray over Disha Saliyan murder case
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या सहाय्यकावर ईडीने फास आवळला; मनी लोंड्रींग प्रकरणी आरोपपत्र दाखल
- काबूल विमानतळावर हल्लेखोर आणि अफगाण सुरक्षा दलांमध्ये चकमक; एक सैनिक ठार, तीन जखमी
- WATCH : भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेमुळे ठाकरे – पवार सरकार हादरले यात्रेला जनतेचा उदंड प्रतिसाद देवेंद्र फडणवीस
- जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर पीएम मोदींना भेटल्यावर सीएम नितीश म्हणाले – सकारात्मक परिणाम येतील, तेजस्वी म्हणाले – लोकहितासाठी सर्वपक्षीय एकत्र आले