प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात एकापाठोपाठ एक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना ओबीसी राजकीय आरक्षणाच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृहावर भेटलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड काही मिनिटे चर्चा झाली. दरेकर दहा मिनिटांनी निघून गेले त्यानंतर पुढची पंधरा मिनिटे फक्त उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दोघांमध्येच चर्चा झाल्याचे समजते.Narayan Rane – Shiv Sena’s feud is real? Ki Thackeray – Fadnavis’s closed door discussion is true ?; Strong discussion on social media
बंद दाराआडच्या चर्चेच्या बातम्या बाहेर आल्याबरोबर सोशल मीडियावर जोरदार चर्चेला सुरुवात झाली. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेले भांडण खरे मानायचे? की ठाकरे फडणवीस यांच्यात झालेली बंद दाराआडच्या चर्चा खरी मानायची?, असे सवाल नेटिझन्सनी सोशल मीडियावर उपस्थित केले आहेत.
नारायण राणे उघडपणे शिवसेनेवर तोफा डागत आहेत. शिवसेना नेतेही त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊन आग पाखडून घेत आहेत, तर दुसरीकडे ज्यांच्या नावाने नारायण राणे यांनी “कानाखालीचा आवाज” टाकला होता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र भाजपच्या नेत्यांशी एका बैठकीच्या निमित्ताने का होईना पण काही वेळ बंद दाराआडच्या चर्चा करतात, याला नेमके काय म्हणायचे??
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस हे नारायण राणे यांना गॅसवर ठेवतात? की फडणवीसांशी चर्चा करून मुख्यमंत्री सध्या त्यांच्यासमवेत असलेल्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला गॅस वर ठेवतात? असे मानायचे अशी चर्चा ही सोशल मीडियावर रंगली आहे.
नारायण राणे यांचे आरोप उघड आहेत. शिवसेना नेत्यांची त्यांच्यावरची आगपाखड देखील समोरून आहे. पण ठाकरे – फडणवीस यांची चर्चा मात्र सह्याद्री अतिथीगृहाच्या दालनातील बंद दाराआड तशीच झाकून राहिली आहे. दोन्ही नेते या विषयी बोललेले नाहीत.
Narayan Rane – Shiv Sena’s feud is real? Ki Thackeray – Fadnavis’s closed door discussion is true ?; Strong discussion on social media
- कोणाच्या वहिनीवर कोणी अॅसिड फेकले…??; नारायण राणेंचे गंभीर आरोप कोणावर…??, जन आशीर्वाद यात्रेत जोरदार चर्चा
- नाशिकच्या मैदानात अमित ठाकरेंची पहिली गर्जना, म्हणाले – कोणतही सरकार कायम नसत
- अमरिंदर सिंग नव्हे, तर आता थेट काँग्रेसश्रेष्ठींनाच टाकला नवज्योतसिंग सिध्दूंनी “आवाज”; म्हणाले, मला निर्णय घेऊ दिला नाहीत, तर ईट से ईट बजा दुंगा…!!
- काँग्रेसचा शिस्तीचा अजब बडगा, जी 23 मध्ये जाऊन शिस्तभंग करणारे पृथ्वीराज चव्हाण शिस्तपालन समितीचे अध्यक्ष