केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबरला नारी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलंय.Narayan Rane: Rane’s blast before the inauguration! Chipi’s credit is ours
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी येथे बांधण्यात आलेल्या विमानतळाचे उद्या उद्घाटन होणार आहे. चीपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्ध व ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. मात्र, उद्घाटन सोहळ्यापूर्वीच पुन्हा एकदा श्रेयाचा वाद पेटला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबरला नारी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलंय. महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गरज नसल्याचं राणे म्हणालेत. तसेच हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे उद्घाटन करतील. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावलंच पाहिजे असं काही नाही, असं राणे म्हणाले होते.
येत्या 9 ऑक्टोबर रोजी 12.30 वाजता चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. त्यावेळी मी उपस्थित राहणार आहे. मी आणि ज्योतिरादित्य शिंदे विमानाने मुंबईत येऊ. तिथून सिंधुदुर्गाला जाणार आहोत. सात वर्ष हे विमानतळ बांधून तयार होतं. वाहतुकीला उपलब्ध नव्हतं. मी ज्योतिरादित्य शिंदेना भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळाच्या उद्घाटनाचा वेळ घेतला, असं राणे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे एका मुलाखतीत म्हणाले की , चिपी विमानतळावरुन पहिलं विमान जेव्हा उड्डाण करेल तेव्हा मला खूप आनंद होईल. माझ्या आयुष्यातील स्वप्न होतं की या सिंधुदुर्गातून विमानाने टेक ऑफ घ्यावा आणि ते उद्या पूर्ण होत आहे. सिंधुदुर्गातील लोक साक्षीदार आहेत. यांनी काय केलं तेव्हा ? सगळ आम्हीच सर्व केलय. परवानगी सुद्धा मीच आणली आहे. यांना कोण विचरतंय दिल्लीत? कायद्याने कामे करावी लागतात.
पुढे राणे म्हणाले की पदाधिकाऱ्यांचा तसेच लोकप्रतिनिधींचा सिंधुदुर्गातील कंत्राटदारांना फार त्रास आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तेव्हाही गाडी घेतल्याशिवाय काम करू दिलं नाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी.
Narayan Rane: Rane’s blast before the inauguration! Chipi’s credit is ours
महत्त्वाच्या बातम्या
- पवार सोलापूरात असताना राजू शेट्टींच्या पंढरपुरातून तोफा; पवारांच्या तोंडी मोदींचीच भाषा!!
- सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
- नितीन गडकरी : आता तुमची गाडी 140 किमी प्रतितास वेगाने धावणार ! एक्स्प्रेस वेवर वेग मर्यादा वाढवण्याची तयारी
- काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल; छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंगदेव यांची स्पष्टोक्ती