• Download App
    Narayan Rane cautioned to file a case if he wrongly quoted and defamed

    दाेन चार दगड मारून गेले यात कसला पुरुषार्थ, बदनामी केली तर गुन्हा दाखल करेल, नारायण राणे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    चिपळूण : राज्यात शिवसेना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरूद्ध आंदोलन करत आहे. दाेन चार दगड मारून गेले यात काही पुरुषार्थ असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. Narayan Rane cautioned to file a case if he wrongly quoted and defamed

    चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, कुठल्याही माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. माझ्या विराेधात गुन्हा दाखल झाल्याचे मला माहीत नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. माझी विधाने तुम्ही तपासून पाहा. माझा गुन्हा नसताना जर बदनामी केली गेली, तर मी मीडियावर गुन्हे दाखल करेन.

    कोण शिवसेना असा सवाल करत राणे म्हणाले, नारायण राणे यांनी ज्या दिवशी शिवसेना साेडली त्याचदिवशी शिवसेना संपली.

    नाशिक येथील भाजपच्या कार्यालयावर केलेली दगडफेकीबाबत त्यांना विचारले असता, दाेन चार दगड मारून गेले यात काही पुरुषार्थ नसल्याचे त्यांनी सांगितले. जे काही करतायत ते करू देत, काय पुरूषार्थ आहे ते आम्हीही पाहू.



    मी बाेललाे ते क्रिमिनलच नाहीच आहे, ते तपासून पाहावे. ज्यावेळी प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबाबत वक्तव्य केले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे थोबाड फोडण्याची भाषा केली होती. तेव्हा गुन्हा का दाखल झाला नाही? आता सरकारच्या दबावामुळेच हे केले जात असून, आमचीही केंद्रात सत्ता आहे आम्ही पाहूच ना, असा सूचक इशारा राणे यांनी दिला.

    Narayan Rane cautioned to file a case if he wrongly quoted and defamed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्यदल प्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक!!

    Wadettiwar : ‘दहशतवादी धर्म विचारून हत्या करत नाहीत’ या विधानाबद्दल काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी मागितली माफी

    Pahalgam terror attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य