विशेष प्रतिनिधी
मुंबई : चिपी विमानतळाच्या आजपर्यंतच्या प्रवासात ज्यांचा काही संबंध नव्हता असे काही लोक आता ‘बेगानी शादी मे अब्दुला दिवाना’ या पद्धतीनं उद्या होणारं चिपी विमानतळाचं उद्घाटन माझ्यामुळंच असा आव आणून नाचत आहेत. हेच लोक विमानतळ होऊ नये म्हणून भूसंपादनाला विरोध करत होते, असा आरोप केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.Narayan Rane alleges that those who does nothing for Chippi Airport are dancing like crazy.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये किनाचाही नामोल्लेख न करता चिपी विमानतळाला विरोध करणाऱ्यांचा राणे यांनी समाचार घेतला आहे. राणे यांनी म्हटले आहे की चिपी विमानतळाच्या आजपर्यंतच्या प्रवासात ज्यांचा काही संबंध नव्हता असे काही लोक आता ‘बेगानी शादी मे अब्दुला दिवाना’ या पद्धतीनं उद्या होणारं चिपी विमानतळाचं उद्घाटन माझ्यामुळंच असा आव आणून नाचत आहेत.
हेच लोक विमानतळ होऊ नये म्हणून भूसंपादनाला विरोध करत होते. शेतकऱ्यांना खोटी माहिती सांगून त्यांची माथी भडकावून देत होते. मी राज्यात महसूलमंत्री होतो तेव्हा आज राज्याचे अर्थमंत्री असणारे अजित पवारच तेव्हाही अर्थमंत्री होते. मी त्यांच्याकडून शंभर कोटी रुपये शेतकऱ्यांना ‘अँडव्हान्स’ म्हणून देण्यासाठी मागितले. त्यांनीही ते दिले.
सिंधुदुर्गच्या कलेक्टरांच्या खात्यात ते जमा होते. पण आज याच विमानतळाच्या नावाने नाचणाऱ्यांनी त्यावेळी विरोध केल्यानं जमा झालेले शंभर कोटी परत गेले. आजही विकासकामं सुरु असतील तिथं जाऊन हेच लोक कंत्राटदारांकडून पैसे उकळतात. गाड्या घेतात. माझ्याकडं या सर्वाची व्यवस्थित माहिती आहे. पण या लोकांना धक्क्याला लावण्याची ही वेळ नाही. कोकणच्या विकासाला विरोध करण्याच्या या क्षुद्र प्रवृत्तीकडं आनंदाच्या क्षणी मी दुर्लक्ष करतो.
चिपी विमानतळासाठी आपण केलेले प्रयत्न सांगताना राणे म्हणतात, सन 2009 ला भूमिपूजन झालं. त्यानंतर सातत्यानं पाठपुरावा करत राहिलो. मुंबई-दिल्ली वाऱ्या करुन पत्रं देत राहिलो. पण राजकीय विरोध चालूच होता. त्यावर मात करुन कासवगतीनं का होईना विमानतळाची कामं पुढं रेटत राहिलो.
अखेर उद्घाटनासाठी 2021 साल उजडावं लागलं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात माझा समावेश झाल्यानंतर मी तातडीनं मंत्रीमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. आमच्या पहिल्याच बैठकीत 9 ऑक्टोबर 2021 ही चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली. कोकणवासीयांच्या उदंड प्रेमातून आणि सहकार्यातून ठरल्याप्रमाणं ते होईलही.
Narayan Rane alleges that those who does nothing for Chippi Airport are dancing like crazy.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
- ब्रिटनमध्ये भारतीय प्रवाशांची क्वारंटाइनची कटकट मिटली, भारत आणि ब्रिटनदरम्यान प्रवास सुलभ करण्यासाठी सहमती, दोन्ही देशांच्या नियमांत बदल
- Cruise Drugs Case : यामुळे फेटाळला आर्यन खानचा जामीन; जेथे कसाब, सलेम आणि संजय दत्तने भोगली शिक्षा त्याच कारागृहात आर्यनची रवानगी
- मोठी बातमी : केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा राजीनामा, म्हणाले- राष्ट्राची सेवा करणे परमसौभाग्य, पुन्हा शिक्षण जगतात परतणार