• Download App
    रक्ताचाही काळा बाजार होतोय, काही गलिच्छ डॉक्टरांनी पेशाला काळिमा फासलाय; नाना पाटेकरांची खंत|nana patekar criticises black markting of blood in india

    रक्ताचाही काळा बाजार होतोय, काही गलिच्छ डॉक्टरांनी पेशाला काळिमा फासलाय; नाना पाटेकरांची खंत

    प्रतिनिधी

    पुणे :  आपला समाज कोणत्या अवस्थेला येऊन ठेपलाय पाहा… इथं रक्ताचाही काळा बाजार होतोय आणि काही गलिच्छ डॉक्टरांनी आपल्याच पेशाला काळिमा फासलाय, अशी खंत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. नाम फाऊंडेशन आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिराच्या वेळी त्यांनी आपली परखड मते मांडली.nana patekar criticises black markting of blood in india

    नाना पाटेकर म्हणाले, “आपल्याच समाजाची ही दूरवस्था आहे, की काही गलिच्छ डॉक्टर मंडळींनी पेशाला काळिमा फासला आहे. रक्ताचाही काळाबाजार होतोय. आपण सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीला सांगितले, तर ते लगेच ऐकतात,



    पण दुसर्‍या बाजूला काही मंडळी त्यांना दूषणे देत असतात. या पिढीला काही कळत नाही. ते कसेही वागतात. माझे अशा व्यक्तींच्याविरुद्ध मत आहे. खरेतर आजच्या एवढी तरुण पिढी कोणतीच सजग नव्हती,” अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

    पुढे बोलताना नाना म्हणाले, “वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता आपण देशभरात सर्व विद्यापीठात रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहोत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज पुण्यात शिबिराचे आयोजन केले आहे.

    ही चांगली गोष्ट असून यात तरुण वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला आहे. अधिकाधिक तरुणांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे,” असे आवाहन नाना पाटेकर यांनी यावेळी केले.

    nana patekar criticises black markting of blood in india

    वाचा…

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!