• Download App
    नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार शक्य; नितीन गडकरींची माहिती|Nagpur to Pune journey will be possible in just 8 hours; Information about Nitin Gadkari

    नागपूर ते पुणे प्रवास अवघ्या 8 तासात होणार शक्य; नितीन गडकरींची माहिती

    प्रतिनिधी

    नागपूर : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला आणखी एक वेगळा आयाम जोडला जात आहे. या संदर्भातली माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपूर ते पुणे अंतर पाहता सध्या या प्रवासाला रस्ते मार्गाने 14 ते 16 तास लागतात. तोच प्रवास आता 8 तासांवर येणार आहे.Nagpur to Pune journey will be possible in just 8 hours; Information about Nitin Gadkari



    सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे – संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे ने जोडण्यात येईल. हा महामार्ग NHAI द्वारे संपूर्ण नवीन अलाईंमेंट घेऊन तयार करण्यात येईल, यामुळे पुणे – छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर – छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार आहे. #PragatiKaHighway, असे नितीन गडकरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्ट बरोबरच गडकरींनी प्रस्तावित अलाईनमेंटचा नकाशाही जोडला असून त्याद्वारे या मार्गावरील प्रवास कसा सुकर होणार आहे, हे स्पष्ट होत आहे.

    सध्या नागपूर ते पुणे अंतर पाहता प्रवासाला साधारण 14 ते 16 तास लागतात आता हा प्रवास 8 तासांवर येणार आहे.

    Nagpur to Pune journey will be possible in just 8 hours; Information about Nitin Gadkari

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस