विशेष प्रतिनिधी
जयपूर: एकदा नागपूरमध्ये काँग्रेसमधील मित्राने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र मी विचारसरणीशी तडजोड केली नाही, असा गौप्यस्फोट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती वाटत आहे, अशी राजकीय टोलेबाजीही त्यांनी केली.Nagpur friend invited to join Congress, Nitin Gadkari
जयपूरमधील राजस्थान विधानसभेमध्ये एका संसदीय परिसंवादामध्ये भाग घेतला होता. तिथे हलक्या फुलक्या वातावरणामध्ये गडकरींनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली. गडकरी यांनी अनेकदा राजकीय चिमटे काढले. मात्र त्यांनी यादरम्यान, कुणाचेही नाव घेतले नाही. यावेळी गहलोत सरकारला चिमटा काढत ते म्हणाले आमदारांना मंत्री न बनल्याचं दु:ख आहे. तर मंत्री चांगलं खातं न मिळाल्याने दु:खी आहे. ज्याच्याकडे चांगलं खातं आहे ते मुख्यमंत्री न बनल्याने दु:खी आहेत. तर मुख्यमंत्री हे पदावरून हटवण्यात आल्याच्या भीतीने दु:खी आहेत.
राजकारणात येणाºया उतार-चढावांबाबत एक उदाहरण देताना गडकरी म्हणाले, नागपूरचे कॉँग्रेसचे नेते डॉ. श्रीकांत जिचकार माझे चांगले मित्र होते. त्यांनी १७ विषयांमध्ये पीएचडी केली होती. मी त्यावेळी निवडणूक हरला होतो. त्यावेळी भाजपाची स्थिती आजच्यासारखी नव्हती. जिचकार मला म्हणाले नितीन, तुम्ही खऊप चांगले आहात. परंतु, या पक्षात तुम्हाला भविष्य नाही. तुम्ही कॉँग्रेसमध्ये या. मी त्यांना नम्रपणे नकार दिला. मी विचारसरणीशी तडजोड केली नाही.
गडकरी म्हणाले, प्रसिध्द लेखक शरद जोशी यांनी एकदा लिहिले होते की, जे राज्यांच्या कामाचे नाहीत त्यांना दिल्लीला पाठविले गेले. जे दिल्लीच्या कामाचे नाहीत त्यांना राज्यपाल बनविले गेले. जे तेथेही कामाचे नाहीत त्यांना राजदूत बनविण्यात आले. मी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना मला एकही जण असा भेटला नाही की जो दु:खी नाही.
ते म्हणाले मला एका पत्रकाराने विचारले की तुम्ही ऐवढे मजेत कसे राहता? त्यावर मी उत्तर दिले की मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही तो खुश राहतो. क्रिकेटमधील वन डे सारखे खेळत राहा. मी सचिन तेंडूलकर आणि सुनील गावसकर यांना चौकार-षटकार मारण्यामागचे गुपित विचारले तर ते म्हणाले हे स्किल आहे. याच पध्दतीने राजकारणही एक स्किल आहे.
गडकी म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट प्रकरणानंतर पद सोडावे लागले होते. अध्यक्षपदावरून हटविले गेल्यानंतर निक्सन यांना लोकांनी कॉलनीमध्ये राहण्यासाठी घरही दिले नाही. निक्सन यांनी लिहिले आहे की माणूस हरल्यामुळे समाप्त होत नाही तर लढण्यामुळे समाप्त होतो.
आपल्याला जीवनात लढत राहायचे आहे. आम्ही कधी सत्तेवर असू किंवा कधी विरोधी पक्षात असू. जे जास्त काळ विरोधात राहतात ते सत्तेवर आल्यावरही विरोधकांसारखेच वागतात. जास्त काळ सत्तेवर राहिलेले विरोधात आल्यावरही सत्ताधाऱ्यांप्रमाणेच वागतात. याचे कारण म्हणजे त्याची सवय पडून गेलेली असते.
Nagpur friend invited to join Congress, Nitin Gadkari
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी
- भुकबळीच्या दिशेने जात असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेच्या भावनेतून मदत, अमेरिका देणार ४७१ कोटी
- देशात आठवड्यात एक विश्वविद्यालय सुरु, गेल्या सात वर्षातील चित्र; केंद्र सरकारचे शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याचा परिणाम
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताचा नवा उच्चांक! ७५ कोटींपर्यंत मारली मजल; WHO कडून अभिनंदन