विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूरकरांसाठी सकारात्मक बातमी तर पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी ..हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानीत गेल्या महिनाभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही. पोलिस आयुक्तांनी मानले नागपूरकरांचे आभार मानले आहेत. Nagpur became the City of Joy , No homicide charges were filed in the month; The Commissioner of Police thanked Nagpurkar
नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत शहर असलेलं नागपूर हत्यांसाठी कुप्रसिद्ध होत. गेल्यावर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB)आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते. याच नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात एक सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. ही नागपूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही माहिती दिली आहे..गेल्या काही महिन्यांमध्ये नागपुर शहरात अनेक मोठी हत्याकांड घडली ज्याने नागपूर पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु फेब्रुवारी महिना नागपूरकरांसाठी आणि नागपूर पोलिसांसाठी दिलासा देणारा ठरला कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच नागपूर शहरात संपूर्ण महिन्याभरात हत्येचा एकही गुन्हा दाखल झालेला आहे.
महिनाभऱ्यात एक ही हत्या न होण्यामागे नागपूर पोलिसांचे विशेष प्रयत्न आणि राबविण्यात येत असलेले वेगवेगळे ऑपरेशन आहे ..
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील पाचही झोनच्या डीसीपी, गुन्हे शाखेला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले. नागपूर पोलिसांनी फूट पेट्रोलिंग, बिट मार्शल सक्षमीकरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे टीम तैनात करून गुन्हेगार वर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले..दामिनी पथक मार्फत महिला सुरक्षेवर भर देण्यात आला..
सामान्य जनतेच्या विश्वास संपादन करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे सामान्य नागपूरकरांच्या सहकार्याने हे शक्य झाले.मात्र हे कायम राहून गुन्हेगारी नियंत्रणात आली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
अमितेशकुमार , पोलीस आयुक्त, नागपूर
Nagpur became the City of Joy , No homicide charges were filed in the month; The Commissioner of Police thanked Nagpurkar
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकवर भडकावू भाषणे आणि अश्लिलतेच्या सर्वाधिक तक्रारी,अकरा कोटींवर पोस्ट हटविल्या, मेटा कंपनीची माहिती
- भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक
- Power of Indian flag : पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी दिल्या भारत माता की जय च्या घोषणा – वाहनांवर तिरंगा- अन् सुरक्षित पडले युक्रेनमधून बाहेर – म्हणाले पाक सरकार खोटारडे – आम्ही पाकिस्तानी आहोत हेच आमचे दुर्दैव …
- पोलींसांची नावे ऐकताच थरथर कापणारे, मुतणारे पाहिलेत, आता धाक उरला नाही, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर