Friday, 9 May 2025
  • Download App
    महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!|MVA's 11 Rallies in maharashtra, but to counter them Shivsena BJP to hold 288 savarkar gaurav yatras

    महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकल्याने काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळे शहा – काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.MVA’s 11 Rallies in maharashtra, but to counter them Shivsena BJP to hold 288 savarkar gaurav yatras

    महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात 11 जाहीर सभा घेण्याचे निश्चित केले. त्याचा विस्तृत कार्यक्रमही जाहीर केला. पण मध्येच राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला. त्यामुळे काही काळ काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष उभा राहिला. पण शरद पवारांनी मध्यस्थी करून ती दरी बुजवली. त्यामुळे आत्ता तरी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात होणाऱ्या 11 सभांच्या कार्यक्रमांमध्ये फरक पडलेला नाही.



    पण सावरकरांचा राहुल गांधींनी अपमान केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांनी मात्र या 11 सभांच्या कार्यक्रमांना काटशह देण्यासाठी सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्धार केला आहे. महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा असा सामना एप्रिल महिन्यामध्ये रंगणार आहे.

    महाविकास आघाडीने 11 सभांची निश्चिती करताना विभागनिहाय महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर अशा शहरांमध्ये या विभागीय स्तरावर मोठ्या सभा होणार आहेत. परंतु त्यालाच काटशह देणाऱ्या सावरकर गौरव यात्रा मात्र महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व म्हणजे 288 विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांमध्ये शिवसेना-भाजपचे नेते आणि कार्यकर्ते काढणार आहेत. त्यामुळे अर्थातच महाविकास आघाडी 11 सभांच्या निमित्ताने जे वातावरण तापवणार आहे, त्याला महाराष्ट्रातल्या सर्व 288 विधानसभा मतदारसंघांमधून शिवसेना – भाजप प्रत्युत्तर देण्याच्या बेतात आहे. अर्थातच हे दोन्ही बाजूंचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन होणार आहे.

     टीजर मधून राहुल गांधींना वगळले

    महाविकास आघाडीच्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेसाठी बाहेर पडला आहे. पण या टीजर मधून राजकीय कौशल्य वापरून महाविकास आघाडीने राहुल गांधींचा फोटो वगळला आहे. या टीजर मध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे अजितदादा पवार आणि नाना पटोले यांच्याच भाषणांचा समावेश आहे. याचा अर्थ सावरकर मुद्द्यावर आजही महाविकास आघाडी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दबावाखाली बॅकफूटवर आहे. पण म्हणून शिवसेना-भाजपचा सावरकर गौरव यात्रेचा कार्यक्रम थांबणार नाही. तो टप्प्याटप्प्याने 288 विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात जोरदार करण्याचाच शिवसेना – भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. हाच महाविकास आघाडी देत असलेल्या राजकीय शहास शिवसेना – भाजपचा काटशह आहे.

    MVA’s 11 Rallies in maharashtra, but to counter them Shivsena BJP to hold 288 savarkar gaurav yatras

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार