• Download App
    लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल MVA health minister rajesh tope not in favour of opening schools in maharashtra

    लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल

    प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षाच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत. राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग तयारी करत असला तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सरसकट शाळा सुरू करण्यास प्रतिकूल आहेत. लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. तसेच कोविडची तिसरी लाट तोंडावर आहे, अशी कारणे त्यांनी सांगितली आहेत. MVA health minister rajesh tope not in favour of opening schools in maharashtra

    राज्यात शाळा सुरु करून धोका वाढवू नये, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलेय. अद्याप लहान मुलांचे लसीकरण झाले नाही. अशातच तिसरी लाटही तोंडावर आहे. लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भावाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास आपण अनुकूल नसल्याचे टोपे म्हणाले.

    तत्पूर्वी, शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील पालकांची मते जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाचे सर्वेक्षण सुरू आहे. यामध्ये आतापर्यंतच्या डेटावरून राज्यातील सुमारे 85 टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग 15जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

    तरीही येणाऱ्या धोक्याची तीव्रता लक्षात घेता काळजी म्हणून राजेश टोपे यांनी सरसकट शाळा सुरू करण्यास प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

    MVA health minister rajesh tope not in favour of opening schools in maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस