प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात जाहीर झालेल्या नगरपरिषदा, नगरपंचायती, नगरपालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत. पाऊस आहे. पूर परिस्थिती निर्माण होत आहे, अशा स्थितीत सरकारी यंत्रणा निवडणूक कामात लावणी कठीण होईल. शिवाय शिवसेना-भाजप युती सरकारची भूमिका ओबीसी आरक्षणास शिवाय निवडणूक नकोत, अशीच असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. Municipal elections not wanted without OBC reservation, will inform Election Commission
राजधानीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटी घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात मांडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा केली. त्याचवेळी महाराष्ट्रात 92 नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ही सरकारची भूमिका दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केली. पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणे अवघड आहे. अनेक ठिकाणी पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर निवडणुकांसाठी सरकारी यंत्रणा लावणे कठीण आहे. त्यामुळे तसेच ओबीसी आरक्षण पूर्ण लागू झाल्याशिवाय निवडणूक पुढे ढकलण्याची सूचना निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला करू, असे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जुन्या भूमिकांचा पुनरुच्चार केला. शिवसेना विधिमंडळ पक्ष आपल्या पाठीशी आहे. बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी नैसर्गिक युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे बाकी कोणी कितीही दावे केले तरी हिंदुत्वाचा मुद्दा आमचाच आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या महापूजा नंतर उपमुख्य मंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
– कसली खोकी? मिठाईची का?
बंडखोर आमदारांना 50 खोकी पचणार नाहीत, असा हल्लाबोल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. या दाव्याची एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली. कसली खोकी? मिठाईची का?, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्या दाव्याला झटकून टाकले.
Municipal elections not wanted without OBC reservation, will inform Election Commission
महत्वाच्या बातम्या
- शिवसेना : “भूतकाळ” विसरून “वर्तमान” गमावले, झाले मोकळे आकाश म्हणत “भविष्या”चे दिवास्वप्न पाहिले!!
- शिंजो आबे : “क्वाड”चे संस्थापक सदस्य, कणखर भारत मित्र!!
- शिवसेनेच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन; तरीही शिंदे गटाची तडजोडीची तयारी!!
- जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला; जाहीर सभेत घातल्या गोळ्या!!; मोदींशी उत्तम केमिस्ट्री!!
- साखर निर्यात : केंद्राचा कारखानदारांना दिलासा, 8 लाख मे. टन निर्यातीला मुदतवाढ