विशेष प्रतिनिधी
मुंबई – मजूर प्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपर्यंत प्रवीण दरेकर यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे.Mumbai Sessions Court orders not to arrest Praveen Darekar till Monday
दरेकर यांनी मुंबै बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले होते.
आज पुन्हा एकदा या प्रकरणी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आज सत्र न्यायालयात सरकारी वकीलांनी उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत दरेकर यांना अटक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी दोन महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने तक्रार केली होती. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून प्रवीण दरेकर याना अपात्र घोषित केले.
त्यानंतर त्यांचा जबाब ही पोलिसांनी नोंदवला तसेच सर्व कागदपत्रे सहकार विभागाने देऊनही पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला.
शेवटी आम्ही जनआंदोलन करण्याची तयारी सुरु केली तेव्हा आज दोन महिन्यांनी मुंबै बँकेच्या बोगस व बनावट मजुरावर गुन्हा दाखल झाला असं आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.
Mumbai Sessions Court orders not to arrest Praveen Darekar till Monday
महत्त्वाच्या बातम्या
- Fake Currency Racket : बनावट नोटा बँकेत भरणाऱ्या ओवैसींच्या एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खानला अटक
- भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर बरसल्या; आता रेल्वे मंत्रालयावरील टीका चर्चेत
- ED IT actions : ईडी – इन्कम टॅक्सच्या कारवाया तेज; पवारांनी बोलवली राष्ट्रवादीची महत्वाची बैठक
- रशियन हल्ल्यांदरम्यान, २०,००० लोक पळाले युक्रेनच्या मैरियूपोल शहरातील स्थिती