• Download App
    मुंबई, महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार । Mumbai, Maharashtra has no lockdown, but strict restrictions; The Chief Minister will take the final decision

    मुंबई, महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोना आणि ओमायक्रोनचे वाढते संकट लक्षात घेतात मुंबईसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. Mumbai, Maharashtra has no lockdown, but strict restrictions; The Chief Minister will take the final decision

    मुंबईसह राज्यात लाॅकडाऊन लावणार नाही पण जनतेला नियमावली पाळावेच लागतील आणि ती नियमावली पाळण्यात कोठे कुचराई झाली तर लाॅकडाऊन लावावे लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

    मुंबईत झालेल्या या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल चहल आदी नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

    मुंबई-पुणे या शहरांमध्ये प्रामुख्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीतले निर्णय मुख्यमंत्र्यांना कळविण्यात येतील आणि अंतिम निर्णय ते जाहीर करतील असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

    Mumbai, Maharashtra has no lockdown, but strict restrictions; The Chief Minister will take the final decision

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती