वृत्तसंस्था
मुंबई : समीर वानखेडे यांच्या संदर्भात कोणतेही ट्विट अथवा सोशल मीडियावर कमेंट करू नये, असे मुंबई हायकोर्टाने स्पष्ट बजावले असताना आणि तसेच लिखित स्वरूपातही मान्य केलेले असताना देखील नवाब मलिक त्याचा भंग का करीत आहेत? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये?, अशी फटकार मुंबई हायकोर्टाने आज लगावली आहे.Mumbai high court issues notice to nawab malik over sameer wankhede family defamation case
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे. नवाब मलिक हे हायकोर्टाच्या आदेशानंतर देखील वारंवार समीर वानखेडे तसेच कुटुंबीयांची बदनामी करणारी वक्तव्ये करत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. त्यावर मुंबई हायकोर्टाने नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करून तुम्ही हेतुतः हायकोर्टाच्या आदेशाचा भंग का करत आहात?, याचे उत्तर द्या, असे आदेश दिले आहेत.
समीर वानखेडे यांच्या संदर्भात तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संदर्भात कोणतीही अनावश्यक कमेंट सोशल मीडियावर करू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्याला मान्यता देऊन नवाब मलिक यांनी तसे लेखी उत्तर देखील हायकोर्टात सादर केले होते. परंतु, त्यानंतर देखील नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबीयांनी संदर्भात सार्वजनिक वक्तव्य करणे सोडले नाही.
समीर वानखेडे हे माझ्याबरोबर नमाज पठाणाला असायचे. पण ते चैत्यभूमीवर कालच दिसले, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्याचबरोबर हायकोर्टाने आदेश देऊनही अनेकदा नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांना संदर्भात वक्तव्ये केली आहेत. याबाबतच हायकोर्टाने तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये? याचे उत्तर प्रतिज्ञापत्र सादर करून द्या, अशा शब्दांत नवाब मलिक यांना फटकारले आहे.
Mumbai high court issues notice to nawab malik over sameer wankhede family defamation case
महत्त्वाच्या बातम्या
- RT-PCR : आरटीपीसीआर टेस्टसाठी आता ३५० रुपये आकारणार ; इतर चाचण्यांचे दरही निश्चित..
- पंजाबात क़ॉंग्रेसचा वचपा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा नव्या जोमाने रिंगणात
- वयाच्या सत्तरीतही गुडघ्याला बांधले बाशिंग, जाहिरातीनंतर इच्छुक वधुंच्या प्रस्तावाचा पाऊस
- रशिया व युक्रेनच्या फौजा आमनेसामने, युद्धाच्या भितीने समस्त युरोपला ग्रासले
- महाराष्ट्रातील सहकारी बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेची कारवाई, १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही