प्रतिनिधी
मुंबई – काँग्रेसच्या नेत्यांनी पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले खरे. पण उत्साहाच्या भरात नेते आणि कार्यकर्त्यांनी दोन बैलांच्या गाडीवर एवढी गर्दी केली, की या नेत्यांच्या भाराने बैलगाडीच कोसळली. त्यामुळे त्यावर चढलेले आंदोलकही खाली आले. सुदैवाने बैलगाडी चालकाने वेळीच कासरा सोडून दिल्याने बैलांना गाडी कोसळण्यामुळे इजा झाली नाही. mumbai congress agitation against price hike end in a fiasco
त्याचे झाले असे… मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन करण्याची तयारी केली. पेट्रोल – डिझेल परवडत नाही म्हणून सामान्य माणसाला कशी बैलगाडी वापरावी लागेल, याचे प्रतिक दाखविण्यासाठी बैलगाडी मागविण्यात आली.
ही बैलगाडी पाहिल्यावर काँग्रेसच्या मुंबईतल्या शहरी कार्यकर्त्यांच्या अंगात उत्साह संचारला. भाई बैलगाडीवर चढून मोदी सरकार विरोधात घोषणा देत होते. कार्यकर्त्यांनी देखील भाईंच्या आवाजात आपला आवाज मिसळला. ते देखील बैलगाडीवर चढून मोदी सरकार विरोधात घोषणा देऊ लागले. पण नुसत्या मोदी विरोधी घोषणा देऊन कसे चालेल… हे आंदोलन काँग्रेसचे वाटले पाहिजे ना… म्हणून मग देश का नेता कैसा हो… राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केल्या…
पण दुर्देव असे, की देश का नेता कैसा हो… राहुल गांधी जैसा हो, अशी घोषणा द्यायला आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीच्या वजनाने बैलगाडी कोसळायाला एकच वेळ आली. कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो… राहुल गांधी जैसा हो, अशी घोषणा दिली मात्र… आणि बैलगाडी कोसळली…!! आणि त्यावर चढून उभे राहिलेले नेतेही हातात उंच धरलेल्या गॅस सिलिंडरसह कोसळले.
नेते आणि कार्यकर्ते कोसळले असले तरी सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. शिवाय बैलगाडी चालकाने देखील वेळीच प्रसंगावधान दाखवून बैलांचा कासरा सोडून दिल्याने बैल थोडे मोकळे होऊन पुढे सरकू शकले आणि ते बैलगाडीबरोबरच कोसळले नाहीत आणि त्यांना दुखापतही झाली नाही.
पण या सगळ्यात काँग्रेसचे महागाई विरोधातले आंदोलन बैलगाडीवरून कोसळल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. अनेकांनी त्याची खिल्ली देखील उडवायला सुरूवात केली. या घटनेचा विडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल झाला.
mumbai congress agitation against price hike end in a fiasco
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाचे कप्पा स्वरूप ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ नाही, तर ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ आहे – केंद्रीय आरोग्य मंत्रालय
- Milk Price Hike : अमूलनंतर आता मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर, दोन रुपये प्रति लिटर महाग