• Download App
    मुंबई : राणीच्या बागेत नुकतच झालय एका नवीन पाहुण्याचं आगमन , वाघिणीच्या बछड्याच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण|Mumbai: A new guest has just arrived in Rani's garden, naming the calf of Waghini by Mayor Kishori Pednekar

    मुंबई : राणीच्या बागेत नुकतच झालय एका नवीन पाहुण्याचं आगमन , वाघिणीच्या बछड्याच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण

    बऱ्याच कालावधीनंतर राणीच्या बागेत वाघाच्या बछड्याचं आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे.Mumbai: A new guest has just arrived in Rani’s garden, naming the calf of Waghini by Mayor Kishori Pednekar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईच्या वीर जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नुकतच एका नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे.बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर) आणि करिष्मा (मादी) यांनी १४ नोव्हेंबर रोजी एका मादी बछड्याला जन्म दिला.दरम्यान आज या बछड्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण करण्यात आलं.

    वीरा बछड्याचं आगमन

    या बछड्याला वीरा हे नाव देण्यात आलंय.वाघीण करिष्मा व बछडा “वीरा” सुखरूप असून बछडा आता दोन महिन्याचे झाले आहे.वाघीण करिष्मा तिच्या बछडयाची व्यवस्थित काळजी घेत असून बछड्याची उत्तम वाढ होत आहे.या रुबाबदार बछड्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.बऱ्याच कालावधीनंतर राणीच्या बागेत वाघाच्या बछड्याचं आगमन झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे.



    दरम्यान महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की ,”वीरा” सहा महिन्यांची होईपर्यंत तिला पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून वीराला जंताची औषधे व लसीकरण करण्यात येत आहेत.पशुवैद्यकांच्या उपस्थितीत फक्त प्राणीपालास बछड्याजवळ जाण्याची परवानगी देण्यात आली असून तिला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही,याची काळजी घेण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

    शक्ती (नर ) व करिष्मा ( मादी) वाघाची जोडी

    दि.१२ फेब्रुवारी २०२० रोजी औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन प्राणीसंग्रहालयातून बंगाल वाघाची जोडी शक्ती (नर ) व करिष्मा ( मादी) मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयामध्ये आणण्यात आली.वाघाकरिता नवीन तयार करण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये नैसर्गिक अधिवास निर्मिती धबधबा, पारदर्शक काचेची प्रदर्शनी, अनुकूल लँण्डस्केप इत्यादी तयार करण्यात आले.

    Mumbai: A new guest has just arrived in Rani’s garden, naming the calf of Waghini by Mayor Kishori Pednekar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस