• Download App
    गुरू कमोडिटीचा गुरू कोण? खासदार उदयनराजेंनी DCC बँकेच्या आडून साधला पवार कुटुंबावर निशाणा । MP Udayanraje Bhosale Criticizes Ajit Pawar in Satara

    गुरू कमोडिटीचा गुरू कोण? खासदार उदयनराजेंनी DCC बँकेच्या आडून साधला पवार कुटुंबावर निशाणा

    जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी सातारा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने नोटीस बजावली याचा धागा पकडत काल जिल्हा मध्यवर्ती बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार उदयनराजेंनी पाहिली प्रतिक्रिया देत बँकेच्या संचालक मंडळावर आणि कामकाजावर टीका केली आहे. MP Udayanraje Bhosale Criticizes Ajit Pawar in Satara


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिल्याप्रकरणी सातारा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीने नोटीस बजावली याचा धागा पकडत काल जिल्हा मध्यवर्ती बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार उदयनराजेंनी पाहिली प्रतिक्रिया देत बँकेच्या संचालक मंडळावर आणि कामकाजावर टीका केली आहे.

    उदयनराजे म्हणाले की, सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या मालकीच्या असतात. कुठल्याही व्यक्तीमुळे ही बँक नाही. मी दबाव टाकून बँकेत आलेलो नाही. लोकांनी त्यांच्या पैशांची देखरेख करण्यासाठी मला बँकेत पाठवलं आहे.. मी जागा अडवण्यासाठी बँकेत आलो नाही.. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार का केला नाही? जरंडेश्वर कारखाना गुरू कमोडिटीच्या ताब्यात आहे मात्र याचा गुरू कामोडीटीचा गुरू कोण? असा सवाल उपस्थित केला आहे. कारखाना कुणाच्या मालकीचा आहे असा सवाल उपस्थित पवार कुटुंबावर पुन्हा एकदा निशाण साधला आहे.



    ते पुढे म्हणाले की, ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या ते पुन्हा सहकारात कसे काय? ज्यांनी ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीत काढल्या त्यांनी 10 तारखेच्या आत फॉर्म माघारी घ्यावे माझी पण माघार असेल असे सांगत आमदार शिवेंद्रराजे यांच्या मोडकळीत आलेल्या अजिंक्यतारा महिला सहकारी बँकेवर निशाण साधत शिवेंद्रराजेवर नाव न घेता टोला लगावला आहे.

    MP Udayanraje Bhosale Criticizes Ajit Pawar in Satara

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू