• Download App
    पावसाळी अधिवेशन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटींची तरतूद, 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या |Monsoon session Provision of Rs 4,700 crore for regular loan defaulters, additional demands of Rs 25,826 crore

    पावसाळी अधिवेशन : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 4,700 कोटींची तरतूद, 25,826 कोटींच्या पुरवणी मागण्या

    प्रतिनिधी

    मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (१७ ऑगस्ट) २५ हजार ८२६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली आहे.Monsoon session Provision of Rs 4,700 crore for regular loan defaulters, additional demands of Rs 25,826 crore

    शिंदे सरकारच्या पहिल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५,८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. या मागण्या मांडल्या. महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी तसेच नगरपालिकांना विशेष अनुदान म्हणून एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.



    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी उभारलेल्या कर्जावरील बांधकाम कालावधीतील व्याजापोटी तसेच या प्रकल्पाच्या समभागापोटी रस्ते विकास महामंडळाला भागभांडवली अंशदान म्हणून प्रत्येकी एक हजार अशी एकूण दोन हजार कोटींची तरतूद त्यात आहे. या मागण्यांवर पुढील आठवड्यात सलग दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.

    पुरवणी मागण्यांची खातेनिहाय तरतूद पुढीलप्रमाणे…

    सहकार, पणन, वस्त्रोद्योग : ५ हजार १४५ कोटी रुपये,
    सार्वजनिक बांधकाम : ४ हजार २९५ कोटी
    सामाजिक न्याय, विशेष साहाय्य : २ हजार ६७३ कोटी
    सार्वजनिक आरोग्य : २ हजार २५९ कोटी
    गृह : १ हजार ९९३ कोटी,
    नगरविकास : १ हजार ८८६ कोटी
    महिला आणि बालविकास : १ हजार ६७२ कोटी
    ग्रामविकास : १ हजार ३०१ कोटी रुपये

    Monsoon session Provision of Rs 4,700 crore for regular loan defaulters, additional demands of Rs 25,826 crore

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस