Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सोमवारी (19 जुलै) झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी (20 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय गटाला संबोधित केले. यादरम्यान कॉंग्रेसला फैलावर घेतानाच त्यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेदरम्यान आपल्या सर्व नेत्यांना अधिकाधिक काम करण्यास सांगितले. Monsoon Session PM Modi Said Congress Is Loosing Its Existence Everywhere But It Is More Worried About BJP
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सोमवारी (19 जुलै) झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी (20 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय गटाला संबोधित केले. यादरम्यान कॉंग्रेसला फैलावर घेतानाच त्यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेदरम्यान आपल्या सर्व नेत्यांना अधिकाधिक काम करण्यास सांगितले.
कॉंग्रेसचे फक्त आरोपांचे राजकारण
पंतप्रधान मोदींनी संसदेत विरोधी पक्षांकडून होणारा गोंधळ आणि सदनाच्या कार्यवाहीतील अडथळा यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, जेव्हा संपूर्ण मानव जात कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जात आहे, तेव्हा विरोधी पक्षांची ही वृत्ती अत्यंत बेजबाबदार आहे. पंतप्रधान म्हणाले की, कॉंग्रेस सर्वत्र संपत चालली आहे, परंतु त्यांना स्वत:पेक्षा भाजपची जास्त चिंता आहे. विरोधक निराश झाले आहेत, म्हणूनच ते चर्चेपासून दूर पळत आहेत. ते म्हणाले की, कॉंग्रेस आरोपांचे राजकारण करते. बर्याच राज्यांत कॉंग्रेस संपत आहे, त्यामुळे चर्चेऐवजी ते गोंधळ घालत आहेत. पंतप्रधान म्हणाले की आसाम, केरळ आणि बंगालच्या सार्वत्रिक निवडणुकांत ते पराभूत झाले, तरीही कॉंग्रेसला जाग आली नाही. त्यांना आमची चिंता आहे, स्वत:ची नाही.
पंतप्रधानांनी विरोधकांच्या वर्तनावर चिंता व्यक्त केली
बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, पंतप्रधानांनी विरोधी पक्षाच्या या वर्तनाबद्दल मोठी चिंता व्यक्त केली. सभागृहात चर्चा व्हावी आणि अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. यासाठी विरोधी पक्षांनी चर्चेत भाग घ्यावा.
जोशींनी पुढे सांगितले की पंतप्रधान म्हणाले, ‘दोन वर्षांपासून देश कोरोना साथीशी लढा देत आहे. याचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर झाला आहे, परंतु विरोधी पक्षाची वृत्ती विशेषत: कॉंग्रेसची अत्यंत बेजबाबदार आहे.
जोशी यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी सर्व खासदारांना कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेसाठी आपापल्या क्षेत्रात जनजागृती अभियान चालविण्यास सांगितले तसेच केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेचा लाभ प्रत्येक गरिबांपर्यंत पोहोचावा याची काळजी घेण्याचेही निर्देश दिले.
विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांसह विविध विषयांवर विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज सोमवारी विस्कळीत झाले. गोंधळामुळे पंतप्रधानांना दोन्ही सभागृहात मंत्रि परिषदेच्या सदस्यांची ओळख करून देता आली नाही. नंतर त्यांना मंत्र्यांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवावी लागली.
Monsoon Session PM Modi Said Congress Is Loosing Its Existence Everywhere But It Is More Worried About BJP
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात आईचा 12 वर्षांच्या मुलासोबत अश्लील डान्स, महिला आयोगाची पोलिसांना FIR दाखल करण्याची मागणी
- Monsoon Session : राज्यसभेची कार्यवाही पुन्हा सुरू झाली, विरोधकांच्या गोंधळातच कोरोना महामारीवर चर्चा
- बकरी ईदच्या पूर्वसंध्येला इराकची राजधानी बगदादमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 जण ठार, 35 जखमी
- 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : 11वी प्रवेशासाठीच्या CET चे वेळापत्रक जाहीर, अशी असेल प्रक्रिया
- Saamana Editorial : स्वातंत्र्यलढ्यावेळी असणारा हिंमतवाला काँग्रेस पक्ष आता उरला नाही, सामना अग्रलेखातून काँग्रेसला कानपिचक्या, संघाची केली स्तुती