• Download App
    खंडणीच्या रक्कमेचे मनी लाँड्रिंग, अनिल देशमुखांचे सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ Money laundering of ransom money, increase in judicial custody of Anil Deshmukh's aides Sanjeev Palande and Kundan Shinde

    खंडणीच्या रक्कमेचे मनी लाँड्रिंग, अनिल देशमुखांचे सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

    वृत्तसंस्था

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. Money laundering of ransom money, increase in judicial custody of Anil Deshmukh’s aides Sanjeev Palande and Kundan Shinde

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या भ्रष्टाचाराच्या आरोपांची गंभीर दखल घेत सीबीआयनं देशमुखांविरोधात २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. त्यांनतर ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

    त्यात देशमुखांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली. सोमवारी ईडीने पलांडे आणि शिंदेविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. त्यातच मंगळवारी पलांडे आणि शिंदे यांच्या जामीन अर्जावरही सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.



    मात्र, ईडीकडून दाखल झालेल्या दोषारोपपत्राची प्रत आरोपींना दिली नसल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं. त्याची दखल घेत मुंबई सत्र न्यायालयानं दोघांच्याही कोठडीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. या सुनावणीदरम्यान आरोपींना कुटुंबियांस न्यायालयातच भेटण्याची परवानगी दिली.

    सोमवारी ईडीच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात पलांडे आणि शिंदे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. देशमुख यांच्या आदेशावरूनच सचिन वाझेनं मुंबईतील बार मालकांकडून ४.७० कोटी रुपयांची खंडणी गोळा केली.

    ही खंडणी वाझेनं संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आणून दिली. पलांडे व शिंदे यांनी हा खंडणीचा पैसा दिल्लीतील चार बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हवाला पद्धतीनं अनिल देशमुखांच्या नागपुरातील श्री साई शिक्षण संस्था या शैक्षणिक व चॅरिटेबल ट्रस्टमध्ये गुंतवला. यामुळेच यांत पैशांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप आहे.

    Money laundering of ransom money, increase in judicial custody of Anil Deshmukh’s aides Sanjeev Palande and Kundan Shinde

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!