• Download App
    धनंजय मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश|Message from Renu Sharma to key NCP leaders to put pressure on Dhananjay Munde

    धनंजय मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह इतर पक्षाच्याही अनेक नेत्यांना संदेश पाठविल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तिच्या जप्त केलेल्या मोबाइलमधून अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.Message from Renu Sharma to key NCP leaders to put pressure on Dhananjay Munde

    धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पुढे हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष २ कडे वर्ग करण्यात आला. शर्मा हिच्यावर पाच कोटी रुपयांसह महागड्या गिफ्टची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानुसार मध्य प्रदेश येथून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.



    यादरम्यान पोलिसांनी तिच्याकडून मोबाइल तसेच काही कागदपत्रे जमा केली. तसेच तिने अशाच प्रकारे हनी ट्रँपद्वारे आणखीन एकाकडून पैसे उकळल्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार आली आहे. तसेच ती आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग असल्याचा संशय सरकारी वकिलांनी न्यायालयात वर्तवला होता.

    तसेच, रेणू तपासाला सहकार्य करत नसून, तिने अशा प्रकारे किती जणांकडून पैसे उकळले याबाबत अधिक तपास करायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. तिचे बँक खाते मध्य प्रदेशला असल्याने त्याचाही तपास करणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले होते.

    Message from Renu Sharma to key NCP leaders to put pressure on Dhananjay Munde

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा