• Download App
    May Vasantada's soul rest in eternal peace; Shalinita's attack on Pawar

    राष्ट्रवादी फुटली; वसंतदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल; शालिनीताईंचा पवारांना टोला

    प्रतिनिधी

    सातारा : सिंडिकेट – इंडिकेट सारखी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. पवारांचा पक्ष त्यांच्याच पुतण्याने फोडला. त्यामुळे आज वसंतदादांच्या आत्म्याला आज चिरशांती मिळाली असेल, अशा शब्दांत माझी महसूल मंत्री आणि वसंतदादांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी शरद पवारांना टोला हाणला आहे. May Vasantada’s soul rest in eternal peace; Shalinita’s attack on Pawar

    शरद पवारांनी 1978 मध्ये वसंत दादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस दोन काँग्रेसचे सरकार पाडले होते आणि पुलोद आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवले होते. वसंतदारांच्या जीवनात अखेरपर्यंत शरद पवारांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडल्याची खंत राहिली होती. आज जेव्हा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी वसंतदादा पाटलांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल, असे वक्तव्य शालिनीताई पाटील यांनी केले.


    Script 2 : म्हणे, अजितदादांना मुख्यमंत्री पदाचा शब्द; मग पवार अजितदादांना राष्ट्रवादीतच ठेवून मुख्यमंत्री का नाही करू शकले??


    शालिनीताई पाटील यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यासंदर्भात अजित पवारांविरुद्ध हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात केस ठोकली आहे. अजित पवारांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांना फसवून खाजगी कंपनीच्या घशात घातला, असा आरोप त्यांनी आधीच केला होता. त्यानंतर अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर ईडीने छापे घातले. जरंडेश्वर कारखान्यावर जप्ती आणली. याविषयी त्यांनी शालिनीताई पाटलांनी समाधान व्यक्त केले होते.

    पण आता प्रत्यक्ष शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शालिनीताई यांनी वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल, असे वक्तव्य करून शरद पवारांचे वाभाडे काढले.

    May Vasantada’s soul rest in eternal peace; Shalinita’s attack on Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ