• Download App
    “जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”; अमृता फडणवीसांची कवितेतून टीका । "Malik's goal is to save Javai and black money"; Criticism of Amrita Fadnavis through poetry

    “जावई आणि काळा पैसा वाचवण्याचेच मलिकांचे ध्येय”; अमृता फडणवीसांची कवितेतून टीका

    वृत्तसंस्था

    मुंबई : “बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदांवर पत्रकार परिषदा घेतल्या. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!,” असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे. “Malik’s goal is to save Javai and black money”; Criticism of Amrita Fadnavis through poetry

    भाजपच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला होता. तसेच मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जयदीप राणाचा फोटो पोस्ट केला होता.



    जयदीप राणा ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे केलेल्या आरोपांनतर त्या चांगल्याच भडकल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे पुन्हा नवाब मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मलिकांना काळा पैसा वाचवायचा आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

    बिगड़े नवाब ने-
    प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स,
    प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स,
    प्रेस कॉन्फ़्रेन्स पर प्रेस कॉन्फ़्रेन्स बुलाई-
    लेकिन हर बार झूठ और मक्कारी की ही बाते हमे सुनाई,
    लक्ष्य इनका एक ही है,मेरे भई-
    बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई!

    “Malik’s goal is to save Javai and black money”; Criticism of Amrita Fadnavis through poetry

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!