• Download App
    1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल - किरीट सोमय्याMaharashtra will be free of corruption by January 1 - Kirit Somaiya

    1 जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल – किरीट सोमय्या

    दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र १ जानेवारीला होणार, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.Maharashtra will be free of corruption by January 1 – Kirit Somaiya


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातील ४० नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून राज्याला १ जानेवारीपर्यंत भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. ते आज एका दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.दिवाळी आज असली तरी पाडवा मात्र १ जानेवारीला होणार, असा सूचक इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.



    पुढे किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे की , राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वसूलीमधून जो पैसा लाटला तो कंपनीमध्ये गुंतवणूक केला.पण जो हिस्सा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे .तो अजूनपुढे यायचा आहे.

    माझ्यावर दहा-दहा खटेल दाखल केले, पण मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आव्हान करतो की त्यांनी शंभर मानहानीचे दावे दाखल केले तरी महाराष्ट्र घोटाळेमुक्त करुनच राहणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    Maharashtra will be free of corruption by January 1 – Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी