• Download App
    विधान परिषद : सगळ्या जोर - बैठका, स्ट्रॅटेजी मतपेटीत बंद; निकालापर्यंत अंदाजाचे हवेत उडलेत पतंग!!Maharashtra state council Elections : voting completed as speculations on the rise

    विधान परिषद : सगळ्या जोर – बैठका, स्ट्रॅटेजी मतपेटीत बंद; निकालापर्यंत अंदाजाचे हवेत उडलेत पतंग!!

    प्रतिनिधी

    मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. त्यामुळे सगळ्या जोर-बैठका आणी स्ट्रॅटेजी आता मतपेटीत बंद झाले आहे. पण निकाल लागेपर्यंत प्रसार माध्यमांचे निकालाचे अंदाज पतंगासारखे हवेत उंच उंच उडत आहेत. Maharashtra state council Elections : voting completed as speculations on the rise

    – एकमेकांना टक्के टोणपे

    मतदान सुरू असताना नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टक्के टोणपे हाणून घेतले. वेळ आली होती भाई भाऊ वर पण बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा. आपला मावळा गेला तर चालेल पण कावळा वाचला पाहिजे, असे टोमणे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीला विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मारले, तर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा माज उतरेल, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. राज साहेब लवकर बरे व्हा. देवेंद्र फडणवीस एकटे पडतील, असा टोला दीपाली सय्यदने लगावला. तर कोणीही कितीही पावसात भिजले तरी उपयोग होणार नाही भाजपचे पाच उमेदवार निवडून येतील, असे शरसंधान गोपीचंद पडळकर यांनी साधले.

    – बावनकुळे – अजित पवार भेट

    दरम्यानच्या काळात विधिमंडळ परिसरात भेटीगाठी मुत्सद्देगिरीला उत येऊन गेला. चंद्रशेखर बावनकुळे अजित पवारांच्या भेटीला गेले. काँग्रेसची मते आम्ही 3 मते आम्ही खेचली, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील यांना लगावला. त्यावर मलगेच सतेज पाटील यांनी लगेच तो मी नव्हेच, असा खुलासा करून टाकला.

     

    – भाजपने स्ट्रॅटेजी बदलली?

    मतदान संपल्यानंतर भाजपने स्ट्रॅटेजी बदलल्याची बातमी आली. भाजपचे 5 उमेदवार निवडून येत नाहीत. तेवढी मतांची बेगमी करता आली नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अखेरच्या क्षणी स्ट्रॅटेजी बदलली. त्यामुळे उमा खापरे निवडून येणार नाहीत, तर प्रसाद लाड निवडून येतील असा अंदाज मराठी प्रसारमाध्यमांनी बांधला आहे.

    – भेटीगाठींचे गौडबंगाल

    बावनकुळे आणि अजित पवार यांच्या भेटीत नेमके काय घडले?, हे दोघांनीही सांगितले नाही. त्याचेही अंदाज लावले जात आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप यांची अपक्षांची एकमेकांची मते खेचण्याची स्पर्धा लागली असताना गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे आपल्याच पक्षाची मते फुटली तर नाहीत ना??, याची धास्ती दोन्ही बाजूंना आहे. लवकरच याचा निकाल अपेक्षित आहे.

    Maharashtra state council Elections : voting completed as speculations on the rise

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!