• Download App
    बलात्कारांनी महाराष्ट्र सुन्न पण पोलीसांचा हद्दीचा वाद, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा नोंदवून घेण्यास दोन पोलीस ठाण्यांचा नकार|Maharashtra numb due to rapes but police dispute over boundaries, two police stations refuse to register atrocities against minor girls

    बलात्कारांनी महाराष्ट्र सुन्न पण पोलीसांचा हद्दीचा वाद, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा नोंदवून घेण्यास दोन पोलीस ठाण्यांचा नकार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावतीच्या बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र सुन्न झाला आहे. मात्र, अद्यापही पोलीस या घटनेकडे संवेदनशिलतेने पाहत नसल्याचे दिसत आहे. कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा गुन्हा हद्दीचा वाद घालत पोलीसांनी नोंदवून घेतला नाही. शेवटी रेल्वे पोलीस आयुक्तांना याप्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.Maharashtra numb due to rapes but police dispute over boundaries, two police stations refuse to register atrocities against minor girls

    रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या म्हणण्यानुसार, दोन पोलीस ठाण्यांनी मुलीच्या तक्रारी दाखल करण्यास नकार दिला. गुन्हा त्यांच्या कार्यक्षेत्रात घडला नाही, असे त्यांचे म्हणणे होते. या मुलीची तक्रार का दाखल केली गेली नाही याची चौकशी केली जाईल, असे सांगून खालिद म्हणाले, आम्ही पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. तिला समुपदेशनही केले जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली आहे आणि तपास सुरू आहे.



    उल्हासनगर स्थानकानजिक एका 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. हातोड्याचा धाक दाखवत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडित अल्पवयीन तरुणी उल्हासनगर परिसरात आपल्या आजीसोबत राहते. ती आपल्या आईला भेटण्यासाठी शिडीर्ला गेली होती.

    शिर्डीवरून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ती बसने कल्याणपर्यंत आली. कल्याणमधून ती लोकलने उल्हासनगर स्थानकात पोहोचली. उल्हासनगर स्थानकात उतरल्यानंतर स्कायवॉकवर तिला काही मित्र भेटल्याने ती त्यांच्यासोबत बोलत उभी होती. याच दरम्यान श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तिथे आला.

    त्याने हातातील हातोडीचा तिच्या मित्रांना धाक दाखवत पळवून लावले. त्यानंतर या तरुणीलाही हातोड्याचा धाक दाखवत जबरदस्तीनं स्थानकाच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या पडक्या वसाहतीच्या जवळ नेलं. पीडित अल्पवयीन तरुणीने विरोध केला मात्र आरोपीनं तिला मारहाण करत तिच्यावर अमानुष बलात्कार केला.

    यानंतर आरोपीनं तिथून पळ काढला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधामला अटक केली आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून ठाणे परिसरात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

    Maharashtra numb due to rapes but police dispute over boundaries, two police stations refuse to register atrocities against minor girls

    महत्त्वाच्या बातम्या.

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!